‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘आज रपट जाये तो हमे ना उठाईयो….’
अतिशय प्रतिभावान मनस्वी आणि दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्मिता पाटील (smita patil) अल्पायुषी ठरली. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. परंतु त्या पूर्वी उण्या पुऱ्या दहा वर्षात तिने शंभर वर्षात करून ठेवता येईल इतकं मोठं काम करून ठेवलं आहे. अनेक राष्ट्रीय पुरस्काराची ती मानकरी होती. भूमिका, मंडी, अर्थ, बाजार, मिर्च मसाला, सुबह, मंथन अशा अनेक कलात्मक चित्रपटाची ती अनभिषिक्त सम्राज्ञी होती.
आर्ट फिल्ममध्ये काम करत असतानाच ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला तिने कमर्शियल सिनेमात देखील काम करण्यास सुरुवात केली. १९८२ साली प्रकाश मेहरा यांच्या ‘नमक हलाल’ या चित्रपटात ती अमिताभ सोबत चमकली. या मसाला चित्रपटात एक गाणे होते जे अमिताभ आणि स्मितावर चित्रित झाले होते. गाण्याचे बोल होते ‘आज रपट जाये तो हमे ना उठाईयो….’ अंजान यांच्या शब्दांना संगीतकार बप्पी लाहीरी यांनी संगीत दिले होते. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी हे गाणे गायले होते. कमर्शियल सिनेमांमध्ये काही न पटणाऱ्या गोष्टी देखील कराव्या लागतात.(smita patil)
स्मिता पाटील (smita patil) हे गाणे ऐकल्यानंतर आणि या गाण्याच्या चित्रीकरणाबाबत प्रकाश मेहरा यांनी सांगितल्यानंतर खूपच घाबरली होती. तिने अशा प्रकारचे शूट यापूर्वी कधीच केले नव्हते. हे संपूर्ण गाणे पावसामध्ये चित्रित करायचे होते. पांढरी साडी आणि पांढरा ब्लाउज घालून पावसात हे गाणे चित्रित करायचे असल्यामुळे स्मिता पाटील खूपच नाराज होती. चित्रपटात या गाण्याचे शूट होताना ती प्रचंड नर्व्हस झाली होती. कारण तिची आर्ट फिल्म मधली इमेज खूप वेगळी होती. कलात्मक चित्रपटांमध्ये काही बोल्ड दृश्य असले तरी त्यामध्ये एक लॉजिक असायचे. कथानकाची तशी ती गरज असायची. स्मिता पाटील हिला ह्या गोष्टी माहिती होत्या. पण इथे मात्र ओढून काढून प्रेक्षकांच्या नजरेला बरं वाटावं म्हणून निव्वळ पैसा खेचण्यासाठी अशा प्रकारचे शूट होणार होते.
स्मिताने (smita patil) मनाविरुद्ध परंतु पुरेसा व्यावसायिकपणा दाखवत तिने या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. पण घरी गेल्यानंतर मात्र तिचा बांध फुटला. रात्रभर ती सतत रडत राहिली. संपूर्ण रात्रभर तिला झोप लागणे शक्यच नव्हते. आपण असले घाणेरडे शूट कसे केले याबद्दल ती तिचा स्वतःचा तिरस्कार करू लागली. आपली इमेज आपण स्वत: मातीत मिळवत आहोत असा तिला पश्चाताप वाटत होता. सकाळी पुन्हा ती सेटवर गेली. रात्रभर न झोपल्याने त्यावेळी तिचे डोळे बऱ्यापैकी लाल झाले होते. अमिताभ बच्चन यांनी ओळखले.
=======
हे देखील वाचा : जेव्हा वर्णद्वेषाचा फटका स्मिता पाटील यांना बसला…. तो ही भारतात!
=======
त्यांनी तिची (smita patil) चौकशी केली असताना तिने अमिताभला सर्व हकीकत समजावून सांगितली. सर्व ऐकून घेतल्यानंतर अमिताभ ने तिला सांगितले, ”एक लक्षात घे, आपण कलाकार आहोत. इथे आपल्याला मनाविरुद्ध देखील गोष्टी कराव्या लागतात. बऱ्याचदा कथानकाची डिमांड असते तर कधी चित्रपटाची ती व्यावसायिक गरज असते. एक कलाकार म्हणून आपण तटस्थपणे या गोष्टीकडे पाहायला पाहिजे. हॉलीवुड मधील अनेक कलावंतांचे चित्रपट पहा. त्यात त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला छेदणाऱ्या अनेक भूमिका रंगवलेल्या तुला दिसतील. परिपक्व कलावंताचे तेच वैशिष्ट्य असते की तो सर्व प्रकारच्या भूमिका तितक्याच ताकतीने करत असतो. त्यामुळे कालचा प्रसंग विसरून जा. ही एक व्यावसायिक गरज होती असे समजून त्या कडे पहा.”अमिताभ बच्चनच्या समजावण्यामुळे स्मिता पाटीलला पटले. सिनेमा रिलीज झाला. कुणालाही ते गाणे व्हल्गर किंवा अश्लील वाटले नाही.