Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

The Kashmir Files चित्रपटाने देशाची मानसिकता कशी बदलली?

Sai Tamhankar ला करायच होत आमिर खान शी लग्न म्हणाली,

Kamali Serial: जान्हवीची आई परत येतेय; झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेत साकारणार

Gaadi Number 1760 Movie Trailer:  रहस्य, थरार आणि विनोदाने भरलेल्या  गाडी नंबर

Deepika Padukone ते आलिया भट्ट; बॉलिवूड कलाकारांनीही सामना केलाय ‘या’

Vitthal Vitthal :अवघ्या १५ मिनिटांत चाल लावून तयार झाला हा

SSMB29 : राजामौलींच्या १००० कोटींचं बजेट चित्रपटाचा’बाहुबली’पेक्षाही भव्यसेट!

Amruta Khanvilkar पोहोचली केदारनाथला!

Mili Movie : प्रेमाची वेगळी परिभाषा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची गोष्ट’ सांगण्यासाठी कलाकार आले एकत्र…

 Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची गोष्ट’ सांगण्यासाठी कलाकार आले एकत्र…
Ek Tichi Gosht
नाट्यकला मिक्स मसाला

Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची गोष्ट’ सांगण्यासाठी कलाकार आले एकत्र…

by Team KalakrutiMedia 13/05/2025

Ek Tichi Gosht: कलेचे माध्यम कोणतेही असो नवीन, सर्जनशील विचारांची निर्मिती आणि त्याची देवाणघेवाण होणे गरजेचे असते. नवनवीन कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ घडत जातात तेव्हाच सर्जनशीलतेला वाव मिळत असतो. मनोरंजनविश्वात आपला ठसा उमटवत काहीतरी वेगळं करू पाहणारी अशीच काही मंडळी एकत्र आली आहेत. कै.मधुसूदन कालेलकर हे नाव कलाप्रेमींसाठी नवं नाही. ख्यातनाम नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य / चित्रपट निर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना अखंड रिझवणारे ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत त्यांच्या नातीने गौरी कालेलकर-चौधरी आणि तिचे पती सिद्धेश चौधरी यांनी  ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. कलासंस्कृतीचे व्रत जोपासणाऱ्या या निर्मिती संस्थेने, संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर ह्यांच्या सहकार्याने व‘थिएटरऑन एंटरटेनमेंट‘ आणि ‘पी एस डी जी स्टुडिओज प्रोडक्शन‘ यांच्या साथीने “एक तिची गोष्ट” रंगमंचावर आणली आहे.( Ek Tichi Gosht)

Ek Tichi Gosht
Ek Tichi Gosht

११ मे ला‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ मध्ये झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाला नाट्यरसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली “एक तिची गोष्ट” चे  पुढील प्रयोग शनिवार १७ मे पुण्याच्या भारत नाट्य मंदिर येथे रात्रौ ९.३० वा. आणि शनिवार २४ मे रात्रौ ८.३० वा. श्री शिवाजी  मंदिर दादर येथे होणार आहेत. 

Ek Tichi Gosht
Ek Tichi Gosht

मनमोहक नृत्य, त्याला अर्थपूर्ण संगीताची आणि उत्तम अभिनय, निवेदनाची जोड मिळाल्यावर उभी राहणारी सुंदर कलाकृती आनंदाची अनुभूती देऊन जाते,  हीच  अनुभूती “एक तिची गोष्ट” च्या माध्यमातून नाट्यरसिकांना मिळणार आहे. या सृजनशील कलाकृतीचं खास आकर्षण म्हणजे फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या नृत्याची अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे  यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संगीत निषाद गोलांब्रे यांचे आहे. चाळीशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून या नृत्यनाटिकेची कथा उलगडते. ( Ek Tichi Gosht)

====================================

हे देखील वाचा: ‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग प्रदर्शित…

=====================================

येत्या काळात मराठी कला, साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणं हे  ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’चं उद्दिष्ट असल्याचं गौरी कालेलकर-चौधरी यांनी स्प्ष्ट केलं. भविष्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या व विषयाच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रम राबवणार असून ज्यात कला संस्कृतीपासून तरुणांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशक्तीला वाव देण्याचा प्रयत्न असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितले.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor Virajas Kulkarni and Suraj Parasnis have directed it. Arya Ambekar Ek Tichi Gosht Entertainment Gauri Kalelkar Choudhary Rishikesh Ranade Vaishali Samanth
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.