Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी…” Dharmendra यांना डिस्चार्ज दिल्यानंतर

याला म्हणतात कमबॅक! पिवळी साडी, पायात मराठमोळी कोल्हापुरी चप्पल; Priyanka

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

लहानग्या गरजु मुलांसाठी गायिका Palak Muchhal बनली देवदुत; गिनीज बुक

न्यू नॅशनल क्रश अलर्ट! निळ्या साडीतल्या मराठमोळ्या Girija Oak ला

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

 Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !
टीव्ही वाले मिक्स मसाला

Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

by Team KalakrutiMedia 05/08/2025

Zee Marathi वर प्रेक्षकांच्या मनात घर केलेला आणि खाद्यप्रेमींच्या खास पसंतीस उतरलेला शो ‘आम्ही सारे खवय्ये’ आता पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी या पर्वाची थीम असणार आहे ‘जोडीचा मामला’. जिथे आपले आवडते सेलिब्रिटी जोडपे एकत्र किचनमध्ये उतरणार आहेत, मजा करणार आहेत आणि अर्थातच, स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल घडवणार आहेत.पदार्थ हे निमित्त असणार, पण खरी मेजवानी असेल त्या जोडप्यांमधील नात्यांची. त्यांच्या आठवणी, प्रेमाचे क्षण, आणि कौटुंबिक परंपरांमधून आलेल्या खास पाककृती,  हे सगळं प्रेक्षकांना एका आंबट-गोड प्रवासावर घेऊन जाणार आहे.(Aamhi Saare Khavayye)

Aamhi Saare Khavayye

या पर्वात प्रत्येक भागात एक नवीन सेलिब्रिटी जोडपं सहभागी होणार आहे. ते फक्त पाककृती बनवणार नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी, किस्से आणि आठवणी शेअर करणार आहेत. कधी त्यांची प्रेमकहाणी, कधी लग्नानंतरची पहिली पुरणपोळी, तर कधी झणझणीत मिसळमधून उमटलेला नात्याचा पहिला ठसका. हे सगळं त्यांच्या खास शैलीत उलगडलं जाणार आहे.स्वयंपाक करतानाची दोघांमधली केमिस्ट्री, त्यांच्यातल्या मिश्किल टोमण्यांमधून उमटणारं प्रेम, आणि त्या गप्पांमधून दिसणारी आपुलकी हे सगळं प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आपलंसं वाटेल. या पर्वात प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या विविध भागातील पारंपरिक चवांचाही खास अनुभव मिळणार आहे, कारण प्रत्येक जोडपं आपल्या प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचं प्रतिनिधित्व करणार आहे.

Aamhi Saare Khavayye

या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा आपल्या लाडक्या संकर्षण कऱ्हाडेकडेच आहे. या खास पर्वाबाबत तो म्हणतो की, “खरं सांगायचं तर, स्वयंपाकघर हे फक्त चविष्ट पदार्थ बनवण्याचं ठिकाण नसतं, तिथे रोजच्या आयुष्यातले खास क्षण तयार होत असतात. दोन माणसं एकत्र जेव्हा काहीतरी बनवतात, तेव्हा ताटात फक्त जेवण नसतं, तर त्यांचं नातंही आणखी घट्ट झालेलं असतं.” (Aamhi Saare Khavayye)

==================================

हे देखील वाचा: Aatli Batmi Futali: ‘सखूबाई’ गाण्यात दिसणार गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा !

==================================

संकर्षण पुढे अस ही म्हणतो की,  “हे नवीन पर्व म्हणजे त्या नात्यांचा आणि आठवणींचा एक गोड सुगंध आहे. कुणाचं लग्न झाल्यावर पहिलं पुरणपोळीचं जेवण, कुणाचा पहिला झणझणीत मिसळ खाल्ल्याचा किस्सा, आणि त्यामागच्या मजेदार गप्पा हे सगळं अनुभवायला मिळणार आहे. ही फक्त पाककृतींची सफर नाही, ही आहे प्रेम, स्नेह आणि संस्कृती यांची चविष्ट गोष्ट!”तर मग, सेलिब्रिटी जोड्यांच्या खास रेसिपीज, त्यांच्या मजेशीर आठवणी आणि महाराष्ट्राच्या परंपरांची ही चविष्ट सफर अनुभवण्यासाठी ‘आम्ही सारे खवय्ये – जोडीचा मामला’,९ ऑगस्टपासून, दर शनिवार आणि रविवार, दुपारी १ वाजता, झी मराठीवर पहायला मिळणार आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aamhi Saare Khavayye Aamhi Saare Khavayye Comeback Aamhi Saare Khavayye jodicha Sankarshan Karhade Entertainment Sankarshan Karhade zee marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.