Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Aamir Khan ने ओटीटीला दिला डिच्चू; ‘सितारे जमनी पर’ ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज!
अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या ‘सितारे जमीन पर’ या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे… या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने तब्बल १० वर्षांनंतर पुनरागमन केलं होतं… आता याच चित्रपटाबद्दल आमिर खान याने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आमिर खानने त्याच्या या चित्रपटाला थिएटरमध्ये रिलीजनंतर कुठल्याही ओटीटीवर रिलीज करणार नसल्याची घोषणा केली आहे… यासोबत त्याने आणखी एक मोठा निरणय गेतला आहे.. काय आहे जाणून घेऊयात…( Sitaare Zameen Par)

तर, कुठलाही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही महिन्यांनी ओटीटीवर रिलीज होतो.. मात्र, आमिर खान याने ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट यूट्यूब मूव्हीज-ऑन-डिमांडवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच एका पत्रकार परिषदेत त्याने ही माहिती दिली असून ‘सितारे जमीन पर’ ही फिल्म फक्त युट्यूबवर जनता का थिएटरवर पाहायला मिळणार आहे… भारतात केवळ १०० रुपयांच्या रेंटवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे… तर अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि स्पेनसह ३८ देशांमध्ये ही लोकल प्राइसिंगसह हा चित्रपट उपलब्ध असणार आहे. (Bollywood Movies)

आमिर खान याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सितारे जमीन पर’ १ ऑगस्ट २०२५ पासून जगभरात यूट्यूबवर उपलब्ध होणार आहे. यात आमिर खान, जिनिलिया देशमुख यांच्यासोबत १० गतिमंद दिव्यांग कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.. दरम्यान, या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या आठवड्याचा शेवटी ८८.९ कोटी, दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी ४६.५ कोटी, तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी १८.९५ कोटी, चौथ्या आठवड्याच्या शेवटी ८.६५ कोटी, पाचव्या आठवड्याच्या शेवटी ३.१८ कोटी कमवत एकूण ३८ दिवसांमध्ये या चित्रपटाने १६७ कोटींची कमाई केली आहे…४ वर्षांपूर्वी आलेल्या आमिर खान आणि करिना कपूर यांच्या ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटाचा रेकॉर्ड या चित्रपटाने मोडला आहे… (Sitaare Zameen Par Box office collection)
================================
हे देखील वाचा : Sai Tamhankar ला करायचं होतं आमिर खानशी लग्न म्हणाली, ‘मी आमिरच्या ‘दिल… ‘
=================================
तर, लवकरच आमिर खान ‘लाहौर १९४७’ (Lahore 1947) या चित्रपटात झळकणार आहे… याशिवाय, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर तो बायोपिक करणार आहे आणि ‘महाभारत’ (Mahabharat) या पौराणिक चित्रपटावरही तो लवकरच काम करण्यास सुरुवात करमार हे.. याशिवाय तब्बल ३० वर्षांनंतर आमिर खान सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत ‘कुली’ (Coolie) चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने तो साऊथमध्ये पदार्पण करणार आहे….(Aamir Khan movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi