महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
‘लापता लेडीज’ची भारतातर्फे ९७ व्या ऑस्करसाठी अधिकृत निवड
सिनेसृष्टीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा आणि महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर’. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कारांकडे पाहिले जाते. ‘ऑस्कर’ मिळवणे हे सिनेसृष्टीत कामं करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. भारताच्या वाट्याला हे ऑस्कर पुरस्कार फारच मोजके आले आहेत. मात्र आपल्या देशातील सर्वच नामी कलाकार मंडळी हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
दरवर्षी भारताकडून काही सर्वोत्तम कलाकृती ऑस्करला पाठवल्या जातात. यावर्षी देखील २०२५ सालासाठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. २०२५ च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून एका चित्रपटाची निवड झाली आहे. हा चित्रपट आहे. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’. हा बॉलिवूड चित्रपट यंदा ऑस्कर २०२५ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. नुकतीच या संदर्भात घोषणा करण्यात आली.
प्रसिद्ध आणि प्रतिभावान दिग्दर्शक किरण रावने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर कमाल दाखवली. सुरुवातीला संथ सुरुवात झालेल्या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आणि मग या सिनेमाने कमाईतही वेग घेतला. ‘लापता लेडीज’ हा सिनेमा फक्त क्रिटीक्स नव्हे तर सामान्य लोकांना आणि अनेक कलाकारांना देखील खूप आवडला. या सिनेमाचे प्रचंड कौतुकही झाले. सोशल मीडियावर देखील सिनेमाची भरपूर चर्चा झाली.
आता ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या क्रू साठी सिनेमाच्या ऑस्कर वारीची बातमी मोठा आनंद घेऊन आली आहे. भारताकडून ऑस्करसाठी ‘लापता लेडीज’ ची निवड सगळ्यांना आनंद देणारी ठरत आहे. या बातमीमुळे चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर संपूर्ण टीमसाठी हा अतिशय आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे.
दरम्यान पुढच्या वर्षी होणाऱ्या 97 व्या अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर 2025 साठी भारतातर्फे किरण रावने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ची एंट्री झाली असून, हा सिनेमा सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी नामांकित झाला आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात देखील करण्यात आली आहे. ‘द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या सदस्यांनी अकादमी पुरस्कारांसाठी भारतातर्फे ‘लापता लेडीज’ सिनेमाची अधिकृत प्रवेशाची घोषणा केली आहे. आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या या चित्रपटात प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात रवी किशन आणि छाया कदम यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
=============================
हे देखील वाचा: Bigg Boss 18 चा पहिला प्रोमो आला समोर; यंदा घरात होणार ‘टाइम चा तांडव’…
=============================
तत्पूर्वी पितृसत्ताक पद्धतीवर हलक्या-फुलक्या पद्धतीने भाष्य करणारा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट 29 चित्रपटांच्या यादीतून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. या यादीत बॉलिवूडचा ‘ॲनिमल’, राष्ट्रीय पुरस्कार विजता मल्याळम चित्रपट ‘आट्टम’ आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चर्चेत आलेला ‘ऑल वुई इमॅजिन इज लाइट’, तमिळ चित्रपट ‘महाराजा’, तेलुगू चित्रपट ‘कल्की 2898 एडी’, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि ‘अनुच्छेद 370’ आणि ‘हनु-मान’ यांनाही मागे टाकले आहे.
आसामी दिग्दर्शक जाह्नू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यांच्या निवड समितीने एकमताने आमिर खान आणि किरण राव निर्मित ‘लापता लेडीज’चा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतला.