Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Aamir Khan : हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा; रजनीकांतच्या ‘कुली’मधला लूक वेधतोय लक्ष!
अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या ‘सितारे जीन पर’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे… ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपटाच्या अपशानंतर आमिर खानने दमदार कमबॅक केलं आहे… आता लवकरच तो रजनीकांत (Rajanikant) यांच्यासोबत तब्बल ३० वर्षांनंतर स्क्रिन शेअर करणार असून ‘कुली’ (Coolie) चित्रपटाच्या निमित्ताने तो साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे… ‘कुली’ चित्रपटातील आमिर खान याचा हटके लूक समोर आला असून यात तो दाहा ही भूमिका साकारणार आहे…(Bollywood News)

रजनीकांत यांच्या सोबत आमिरने ३० वर्षांपूर्वी आतंक हा चित्रपट केला होता… त्यानंतर आता तो कुली चित्रपटात कॅमिओ करणार आहे… कुली हा रजनीकांत यांचा तमिळ अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आमिर ‘दाहा’ (Dahaa) ही भूमिका साकारणार असून या लूकमध्ये तो एकदम हटके दिसतोय.. काळ्या रंगाच्या जर्सिमध्ये, डोळ्यांवर गॉगल आणि हातात पाइप घेऊन आमिर उभा आहे. या पोस्टरमधील त्याच्या चेहऱ्यावर असमारे गूढ आणि रंजक हावभाव प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत. (Tollywood)
================================
=================================
‘कुली’ मधल्या आपल्या या लूकबद्दल बोलताना आमिर म्हणाला की, “जेव्हा लोकेश कनगराज यांनी मला विचारले, तेव्हा मी पटकन होकार दिला. मी रजनी सरचा खूप मोठा चाहता आहे”. दरम्यान, ‘कुली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करत असून, रजनीकांत यांची यात प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटा याशिवाय नागार्जुन, उपेंद्र, श्रुती हसन, सौबिन शाहीर आणि सत्यराज हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट तमिळ भाषेह हिंदी, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.(Coolie movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi