राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Aamir Khan : ‘त्या’ ज्येष्ठ मराठी कलाकराने १० हजारांची मदत केली म्हणून मी…
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे… खरं तर आमिरचा चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळा विषय असणार आणि त्याची मांडणीही वेगळ्याच धाटणीची असणार हे आता प्रेक्षकांनाही समजलं आहे… त्यामुळे त्याच्या चित्रपटांकडून नक्कीच प्रेक्षक अपेक्षा ठेवून असतात… आता जरी बॉलिवूडचा आमिर सुपरस्टार झाला असला तरी सुरुवातीच्या काळात त्याला आपलं करिअर घडवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला आहे…आमिरचा फॅमेली Backgrond जरी इंडस्ट्रीतला असला तरीही उमेदीच्या काळात एक शॉर्ट फिल्म बनवण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते… मात्र, मराठीतील एक दिग्गज अभिनेते त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि काहीही न विचारता त्याला पैश्यांची मदत केली… आजही त्या मराठी कलाकराचा आमिर खान ऋणी असून एका मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला आहे… चला तर जाणून घेऊयात.(Entertainment News)
तर, आमिर खान याने नुकतीच लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये शॉर्ट फिल्म तयार करण्यासाठी एका मराठी कलाकाराने केलेल्या मदतीची खास आठवण सांगितली… आमिर म्हणाला की, “१० वी नंतर मी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. माझ्या वर्गात आदित्य भट्टाचार्य होता. बासु दा (दिग्दर्शक बासु भट्टाचार्य) यांचा तो मुलगा. तो एक शॉर्ट फिल्म बनवत होता. त्याने मला विचारलं. मी होकार दिला. या शॉर्ट फिल्मसाठी मी त्याचा अभिनेता, स्पॉट बॉय, फायनान्स मॅनेजर असं सारं काही होतो. पॅरेनॉया असं त्या शॉर्ट फिल्मचं नाव होतं. आम्हाला शॉर्ट फिल्मतर बनवायची होती पण पैसे काही नव्हते.”(Bollywood News)

१९८९-८१ ची ही घटना सांगताना आमिर पुढे म्हणाला की, “त्यावेळी आदित्यने सांगितलं की, याच बिल्डिंगमध्ये डॉ. श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo) राहतात. आपण त्यांच्याकडे पैसे मागून बघूया. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी गेलो. तेव्हा आम्ही फक्त १४-१५ वर्षांचे होतो. काय काम आहे आणि कोणत्या कारणासाठी घरी आला आहात? असं डॉ. लागूंनी विचारलं. आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही एक फिल्म बनवतोय त्यासाठी आम्हाला पैसे हवेत. त्यांनी विचारलं किती? आम्ही सांगितलं १० हजार.” “त्यानंतर डॉ. लागू त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी १० हजार रुपये आम्हाला आणून दिले. हे घ्या आणि बनवा सिनेमा, असं ते आम्हाला म्हणाले.८०च्या दशकात त्यावेळी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती. पण त्यांनी अगदी सहज आम्हाला हे पैसे दिले. आणि म्हणूनच माझी पहिली शॉर्ट फिल्म तयार झाली होती”. अशाप्रकारे आमिरने सुरुवातीच्या काळात डॉ. श्रीराम लागू यांनी मदत केल्यामुळे पहिली शॉर्ट फिल्म तयार झाली होती याचा उल्लेख आवर्जून केला आणि त्यांचे आभारही मानले…(Retri News Tadaka)
================================
हे देखील वाचा: ‘डर’ सिनेमातून आमिर खानचा पत्ता कसा काय कट झाला?
=================================
दरम्यान, आमिर खान याच्या आगामी प्रोजक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो ‘लाहौर १९४७’ (Lahore 1947) या चित्रपटात सनी देओल आणि प्रिती झिंटासोबत झळकणार आहे… त्याशिवाय दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत तो ‘दादासाहेब फाळके’ यांचा बायोपिक तयार करणार आहे आणि ‘महाभारत’ (Mahabharat Movie) या पौराणिक चित्रपटावरही तो लवकरच काम करण्यास सुरुवात करणार आहे… (Aamir Khan movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi