Pushpa 2 पुष्पा २ सिनेमात जोडले जाणार बोनस फुटेज, ‘रीलोडेड’ नावाने
Junaid Khan आमिर खानच्या मुलाला ‘लाल सिंग चड्ढा’, ‘लापता लेडीज’साठी ऑडिशन देऊनही मिळाला नव्हता सिनेमा
आज आपण बॉलिवूडमध्ये पाहिले तर अनेक स्टार किड्स मोठ्या गाजावाजा करत मनोरंजनविश्वात पदार्पण करताना दिसत आहे. अनेक स्टार किड्सने आधीच बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली असून, ते चांगलेच गाजत देखील आहे. अशाच एका स्टार किडने मागच्यावर्षी २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा स्टार कीड आहे, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान. (Aamir Khan Son Junaid Khan)
आमिर खानचा मुलगा अभिनेता जुनैद खानने २०२४ मध्ये ‘महाराज’ (Maharaj) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याची आणि अभिनेत्री शर्वरी वाघची केमिस्ट्री खूपच गाजली. जुनैदने ‘महाराज’ या चित्रपटात काम करण्याआधी त्याच्या वडिलांच्याच आणि किरण रावच्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिले होते. मात्र तिथे त्याची निवड झाली नाही. याबद्दल खुद्द जुनैदनेच एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे. (Bollywood Tadka)
जुनैदने यावेळी सांगितले की, त्याने आणि त्याची सावत्र आई असलेल्या किरण रावने ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) या सिनेमासाठी आई आणि मुलाच्या भूमिकेसाठी सोबतच ऑडिशन दिली होती. जुनैद म्हणाला, “‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये कदाचित मी दिसू शकलो असतो, कारण मी आणि किरण रावने त्यासाठी ऑडिशन दिली होती. (Entertainment mix masala)
आम्ही दोघांनी या चित्रपटासाठी काही सिन देखील शूट केले होते. २० मिनिटांचे फुटेज देखील तयार झाले होते. ही माझी एक परीक्षा होती. माझ्या वडिलांना मला मी चित्रपटाच्या प्रक्रियेशी कसे जुळवून घेतो हे पाहायचे होते. मात्र दुर्दैवाने बजेटच्या कारणामुळे ते शक्य झाले नाही. नवीन कलाकारांसाठी अशा मोठ्या बजेट असलेल्या चित्रपटात काम करणे कठीण असते.” (Bollywood Masala)
जुनैदने केवळ ‘लाल सिंग चड्ढा’च नाही तर ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या आणि कमालीचा गाजलेल्या किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या सिनेमासाठी देखील ऑडिशन दिले होते. त्याने ‘लपाता लेडीज’ चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. मात्र त्याची ऑडिशन पाहून किरण रावने त्याला सांगितले की ‘त्या भूमिकेसाठी स्पर्श श्रीवास्तव जास्त योग्य आहे’. मला ही तिचे म्हणणे पटले होते. (Celebrity Interviews)
=============
हे देखील वाचा : Dev anand: देव आनंदला सुपर हिट सिनेमाची आयडिया कुठे मिळाली?
=============
जुनैद खान आगामी काळात श्रीदेवींची मुलगी खुशी कपूरसोबत (Khushi Kapoor) ७ फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या ‘लव्हयापा’मध्ये काम करताना दिसणार आहे. दरम्यान जुनैद हा आमिर खान आणि रीना दत्ता यांचा मुलगा आहे. आमिरला पहिल्या पत्नीपासून रीनापासून आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. तर किरण राव आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही आमिरने त्याच्या दोन्ही पत्नींसोबत मैत्रीचे नाते टिकवले असून, पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी हे तिघं अनेकदा एकत्र येताना दिसतात.