राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई!
आमिर खान आणि जिनिलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने प्रेक्षकांनी विशेष दाद मिळवली आहे… खरं तर लाल सिंग चड्डा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान काही काळ चित्रपटांपासून लांब गेला होता.. मात्र, सितारे जमीन पर चित्रपटाच्या निमित्ताने त्याने दमदार कमॅक केलं असून बॉक्स ऑफिसवर अवघ्या १२ दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे…(Bollywood)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सितारे जमीन पर चित्रपटाने पहिल्या दिवशी १०.७ कोटी कमवत ओपनिंग केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने ८८.९ कोटी कमवत आत्तापर्यंत १३२.९ कोटींची कमाी केली आहे. इतकंच नाही तर अवघ्या १२ दिवसांत या चित्रपटाने जगभरात २११.२५ कोटींची यशस्वी कमाई केली आहे…(Sitaare Zameen Par movie box office collection)

दरम्यान, याआधी आलेल्या आमिर खानच्या काही चित्रपटांचं कलेक्शन जाणून घेऊयात… ‘दंगल’ ३७४.४३ कोटी, ‘पीके’ ३४०.८ कोटी, ‘धुम ३’ २७१.९७ कोटी, ‘३ इडियट्स’ २०२.४७ कोटी, ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ १४५.५५ कोटी, ‘गजनी’ ११४ कोटी, ‘तलाश’ ९३.६१ कोटी, ‘तारे जमीन पर’ ६२.९५ कोटी, ‘लाल सिंग चड्डा’ ६१.१२ कोटी…(Aamir Khan movies)
================================
हे देखील वाचा: Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’ सुपरस्टारला ऑफर केली होती
=================================
आता लवकरच आमिर खान भारतीय चित्रपटसृष्टीचे जमन दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर चरित्रपट घेऊन येणार आहेत… याव्यतिरिक्त महाभारात हा पौराणिक चित्रपटही तो प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार असून यात भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे…