दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘आन’ हा मेहबूब यांचा पहिला टेक्निकलर चित्रपट
पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला १९५२ साली दिग्दर्शक मेहबूब यांनी पहिला टेक्निकलर चित्रपट बनवला होता ‘आन’. यात दिलीप कुमार, नादीरा आणि निम्मी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.त्या काळात हा एक धाडसी प्रयोग होता. मोठ्या स्केल वर त्याचे प्रमोशन केले गेले. या सिनेमाचा प्रीमियर लंडनला होणार होता. त्यासाठी मेहबूब यांनी या चित्रपटाचे इंग्लिश व्हर्शन ‘सेवेज प्रिन्सेस’ नावाने रिलीज करायचे ठरवले. या प्रीमियरला अनेक नामवंत हॉलीवुडचे कलाकार उपस्थित होते. यात हॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता इरोल फ्ल्यीन हा देखील होता त्याला निम्मीचा अभिनय खूप आवडला. सिनेमा पाहिल्यानंतर तो निम्मीला भेटला आणि तिला अभिवादन करताना तिचा हात आपल्या हातात घेऊन पाश्चात्य पद्धतीने त्याला किस करू लागला ! (Mehboob)
तेव्हा निम्मीने चटकन त्याच्या हातातून हात सोडून घेतला आणि सांगितलं,” मी भारतीय मुलगी आहे. तू अशा पद्धतीने माझ्याशी वागू शकत नाही.” निम्मीची ही कृती त्या काळातील मीडियाची हेडलाईन ठरली होती. दुसऱ्या दिवशी अनेक वर्तमानपत्राचे हेडलाईन होते ‘अन किस्सड गर्ल ऑफ इंडिया’ आजच्या काळातील वाचकांना ही गोष्ट हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे पण निम्मीचा हा खानदानी सुसंस्कृतपणा तिने आयुष्यभर जपला. आजच्या पिढीला निम्मी ही अभिनेत्री माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही परंतु ज्यांनी पन्नाशी पार केली आहे त्यांना नेहमी ही अभिनेत्री चांगली माहिती आहे.
राज कपूरच्या ‘बरसात’ या चित्रपटापासून तिचा रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. खरंतर ती मेहबूब यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी सेटवर आली होती. या सिनेमात राजकपूर काम करत होता. त्याचे लक्ष टप्पोऱ्या डोळ्याच्या सोळा वर्षाच्या या सुंदर मुलीकडे गेले. त्याने लगेच तिला विचारले आणि आपल्या ‘बरसात’ या चित्रपटातील सेकंड लीड एक्ट्रेसची भूमिका तिला दिली. या सिनेमातील प्रमुख अभिनेत्री नर्गीस होती. बरसात मधील निम्मी आणि प्रेमनाथ ही जोडी प्रेक्षकांना विशेषतः तरुणाईला ही अभिनेत्री खूप आवडली. तिच्या डोळ्यांवर प्रेक्षक सुद्धा फिदा होते. ‘बरसात’ नंतर निम्मी कडे चित्रपटांचा अक्षरशः पाऊस पडला. (Mehboob)
अनेक नामवंत अभिनेते तिला आपल्या सोबत घ्यायला उत्सुक होते. राज कपूर सोबत ‘बांवरा’ दिलीप कुमार सोबत आन, उडान खटोला, अमर,दिदार तसेच देव आनंद सोबत सजा, आंधीया या साठी खास आठवले जातात. निम्मी तशी आपल्या करिअरबद्दल फारशी सिरीयस कधीच नाही. त्यामुळे तिने बऱ्याच चित्रपटात सेकंड लीड एक्ट्रेस ची भूमिका देखील केली. यात अमर, शमा, चार दिन चार राहे, आकाशदीप हे चित्रपट येतात. असे म्हणतात १९६३ साली आलेल्या याच्यास एच एस रवेल यांच्या ‘मेरे मेहबूब’ या चित्रपटाची नायिका खरं तर निम्मीच असणार होती. रावेल यांना या सिनेमात निम्मीला च हीरोइन बनवायचे होते. परंतु चित्रपटाचे कथा नक ऐकल्यानंतर तिने हिरोईनच्या ऐवजी हिरोच्या बहिणीची भूमिका स्वीकारली आणि ही तिची मोठी चूक ठरली. पुढे या चित्रपटात नायिकेची भूमिका साधना हिने केली. एकदा बहिणीची भूमिका केल्यानंतर तिच्याकडे त्याच प्रकारच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. (Mehboob)
अनेक चांगले चित्रपट तिच्या हातातून निसटले. ‘आकाशदीप’ या चित्रपटात ती अशोक कुमारची नायिका होती पण चित्रपटातील सगळा फोकस धर्मेंद्र आणि नंदावर होता. साठच्या दशकाच्या मध्यावर निम्मीने एस अली रझा यांच्याशी लग्न केले. त्यापूर्वी तिच्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना घडली होती. ‘मुगल ए आझम या चित्रपटांना नंतर के असिफ यांनी ‘लव अँड गॉड’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती आणि त्यात नायिकेची भूमिका त्यांनी निम्मी ला दिली होती. परंतु हा चित्रपट खूप अनलकी ठरला. कारण या चित्रपटाचा नायक गुरुदत्त १९६४ साली गेला त्यानंतर नायकाच्या भूमिकेत संजीव कुमार आला. पण पुढे के असिफ यांचे निधन झाले.
============
हे देखील वाचा : गुलजार यांचा अप्रतिम पण अनलकी चित्रपट : अचानक
============
हा चित्रपट डब्यात गेला. त्याबद्दल पंधरा वर्षांनी के असिफ यांची पत्नी सरदार अख्तर आणि निम्मी यांनी हा अर्धवट चित्रपट पूर्ण केला आणि १९८६ साली प्रदर्शित केला . त्यामुळे निम्मीच अभिनेत्री म्हणून शेवटचा चित्रपट हा १९८६ साली आला होता असे म्हणतात! हळूहळू निम्मी रसिकांच्या विस्मरणात गेली. २०१२ साली तिने राज्यसभा टीव्हीला एक प्रदीर्घ मुलाखत दिली होती त्यात तिने तिच्या आयुष्यातले अनेक किस्से सांगितले होते. (Mehboob)
२०१५ साली तिला जीवनगौरव पुरस्कार मिळाला. १९६५ साली तिने लग्न केले. संसार सुखाचा झाला. दुर्दैवाने तिला अपत्य प्राप्ती झालीच नाही. तिच्या भाच्यालाच तिने दत्तक म्हणून घेतले होते. एक शांत आयुष्य ती जगली. कधी कुठल्या गॉसिप्स मध्ये अडकली नाही कुठलेही वादग्रस्त विधाने तिने केली नाहीत. एक शांत समंजस आणि परिपक्व असं आयुष्य ती जगली. निम्मी जशी पडद्यावर शांतपणे वावरत होती तसेच शांतपणे जगातून निघून गेली. २५ मार्च २०२० करोनाच्या काळामध्ये तिचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.‘आकाशदीप’ या चित्रपटात तिच्यावर एक नितांत सुंदर गावात चित्रित झाला होता आज देखील हे झाले खास निम्मी साठी आठवले जाते. गीताचे बोल होते ‘दिल का दिया जला के गया आज कोई इस दुनिया मे…’