जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

Horror Marathi Web Series : कोकणातील ‘तो’ वाडा पछाडलाय की जपतोय आपलं अस्तित्व…?
वेब सीरीज, चित्रपट अथवा नाटकांमध्ये मराठी मेकर्स वैविध्यपूर्ण कथानक आणि त्यांची मांडणी करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना पाहायला आवडतील अशा कथा मांडण्याला प्राधान्य दिले जात आहे. सध्या प्रेक्षक हॉरर (Horror) चित्रपट अथवा सीरीजना विशेष प्रतिसाद देत आहेत. हॉरर कलाकृतींच्या या ट्रेण्डमध्ये आता लवकरच एक मराठी हॉरर वेब सीरीज येणार असून कोकणातील एक गुढ कथा उलगडली जाणार आहे. एका कुटुंबाचा अनपेक्षित प्रवास ‘अंधार माया’ (Andhar Maya) या सीरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.(Marathi upcoming projects)
खरं तर, ‘अंधार माया’ या हॉरर वेब सीरीजआधी टी.व्ही चॅनल्सवर ‘गर्ल्स हॉस्टेल’, ‘चंद्रविलास’, ‘अथांग’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘एक घर मंतरलेलं’ या हॉरर मालिका प्रेक्षकांना आवडल्या होत्याच. आता याच पठडीत ‘अंधार माया’ ही वेब सीरीज लवकरच झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. या सीरीजमध्ये कोकणातील खातू कुटुंब अंतिम विधी कार्यासाठी पूर्वजांच्या वाड्यात एकत्र येतात. पण आपल्याच घरात आल्यानंतर घरातील प्रत्येकाचा एक अनपेक्षित प्रवास सुरु होतो. (Horror web series)

इतकंच नव्हे तर ‘अंधार माया’ या सीरीजमध्ये कुटुंबात पूर्वापार लपवून ठेवण्यात आलेली गुपितं नकळतपणे समोर येऊ लागतात आणि वाड्यात विचित्र घटना घडण्यास सुरुवात होते. आता वाडा पछाडलेला आहे की अजून काही गुढ रहस्य इथे जडलेलं आहे हे सीरीजमधूनच उलगडणार आहे. वाड्यात कुणाचं अदृश्य वास्तव्य आहे की वाडा आपलं अस्तित्व पुन्हा साध्य करत आहे हे पाहणं औत्सुक्याचं आहे. (Entertainment news)
================================
हे देखील वाचा: Manoj Bajpayee : पहिल्यांदाच भैय्याजी दिसणार हॉरर-कॉमेडी चित्रपटात!
=================================
दरम्यान, ‘अंधार माया’ ही हॉरर सीरिज Zee5 वर ३० मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या हॉरर सीरीजचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी केलं आहे. शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) व तेजस देसाई यांच्या एरिकॉन टेलिफिल्म्सअंतर्गत या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रात्रीस खेळ चाले मालिकेतील पांडू अर्थात प्रल्हाद कुरतडकर यांनी संवाद लेखन केलं आहे. सीरीजमध्ये किशोर कदमसह ऋतुजा बागवे, शुभंकर तावडे, ओमप्रकाश शिंदे, स्वप्नाली पाटील, अनुप बेलवलकर अशी तगडी कलाकरांची फौज पाहायला मिळणार आहे.(Andhar Maya horror web series cast)