Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक करायचं…”; सदस्याने सांगितला ‘तो’ किस्सा
बिग बॉस (Big Boss Reality Show) हा असा रिएॅलिटी शो आहे जो अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच सहकुटूंब घराघरांत पाहतात. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनपासून ते आत्ताच्या सहाव्या सीझनपर्यंत सगळ्याच सदस्यांनी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं. १०० दिवस एका घरात वेगवेगळ्या स्वभावाच्या, विचारांच्या माणसांसोबत राहणं काही खायची गोष्ट नाहीच. घरात रोज माणसांचे चेहरे तेच तेच का होईना पण दिसतात. मात्र अचानक त्या घरात कुणी दिसत नाही पण काहीतरी विचित्र आवाज येत असेल तर? हो अशी घटना बिग बॉस मराठीच्या एका सीझनमध्ये घडली होती. कोणत्या सदस्यासोबत हा भीतीदायक प्रकार घडला होता जाणून घेऊयात…(Marathi Big Boss)
नुकतीच बिग बॉसच्या आधीच्या सीझनमधील कलाकारांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. यात सदस्यांनी त्यांच्या सीझनमध्ये काय दमती जमती घडल्या होत्या, कोण मास्टरमाईंड होता अशा बऱ्याच मुद्द्यावर चर्चा केली आहे. ‘अभिजात मराठी’ला दिलेल्या या मुलाखतीत पहिल्या सीझनचा स्पर्धक आस्ताद काळे (Astad Kale) याने बिग बॉसच्या सीझनमध्ये सहकलाकार व स्पर्धक रेशम टिपणीससोबत झालेला एक धक्कादायक प्रकार उघड केला.
आस्ताद म्हणाला की, “रेशम चिटणीसला ती झोपलेली असताना रोज भिंतीवर कुणीतरी टकटक करतंय असा आवाज यायचा. दोन-तीन वेळा हा आवाज आल्यानंतर ती घाबरली. नंतर मला सगळा प्रकार सांगितला. मी जिथे झोपायचो तिथे हेडबोर्डच्या खाली असलेल्या प्लायवूडला एक भोक पडलं होतं. गेल्या गेल्याच मला ते दिसलं होत. तिथून मला डेनिम घातलेल्या एका माणसाचा पायाही दिसला होता. ऑपरेट करायला एक जिवंत माणूस तिथे बसला होता. संपूर्ण सेटवर 7 Dop होते. आमच्या सेटवर 250 माणसांचं युनिट होतं.” (Resham Tipnis)

आस्ताद पुढे म्हणाला की, “ज्या ठिकाणी रेशम ताई झोपायची तिथे तिच्या बेडच्या वरती एक काच होती. एका रात्री तिला टकटक ऐकायला आली. २-२ वेळा असं झालं मग ती घाबरली आणि हॉलमध्ये जाऊन बसली आणि घडलेला प्रकार तिने मला सांगितला.यावर मी तिला म्हणालो तू पण टकटक कर. पण याची परवानगी नाही असं मला रेशम म्हणाली. त्यावर ‘मग जो कोणी टकटक करतोय, त्यालाही हे करण्याची परवानगी नाही’ असं मी तिला म्हणालो. नंतर रेशम बेडजवळ गेली. तिथून टकटक आवाज आल्यानंतर तिनेही प्रतिक्रिया म्हणून तिथे टकटक केलं आणि तिथून पळून गेली. नंतर कळलं की भिंतीच्या मागे कॅमेरामन होता. त्या कॅमेरामनला नंतर काढून टाकण्यात आलं. कारण कॅमेरामनची कृती ही स्पर्धकाशी संपर्क साधण्यासाठीची होती असं लक्षात आलं”… (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी
================================
दरम्यान, बिग बॉसच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे (Megha Dhade) ठरली होती. आता या सहाव्या सीझनमध्ये देखीस मुलगीच बाजी मारणार का याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. तसेच, आजच्या रितेश भाऊच्या धक्क्यायावर कोणोकोणाची शाळा घेतली जाणार आणि कुणाचा सहाव्या आठवड्यात येऊन या घरातला प्रवास सपणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Big Boss Marathi Season 6)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi