Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च !

 Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च !
मिक्स मसाला

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च !

by Team KalakrutiMedia 09/09/2025

मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांना एकत्र आणणारा ‘आतली बातमी फुटली’ हा नवा सिनेमा येत्या १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच झालेल्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात दिग्गज कलाकारांची उपस्थिती, संगीत टीमचे अनुभव आणि रंगतदार परफॉर्मन्समुळे हा सोहळा प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरला. हा सिनेमा एका खूनाच्या सुपारीभोवती फिरणारी कॉमेडी क्राइम स्टोरी प्रेक्षकांसमोर आणतो. खूनाची सुपारी कोणत्या दिशेने वळते? या प्रवासात कोणते नातेसंबंध जुळतात आणि त्यातून कोणती धमाल परिस्थिती निर्माण होते? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थेट पडद्यावर अनुभव घ्यावा लागणार आहे. नातेसंबंधांवर भाष्य करतानाच हा चित्रपट प्रेमाचे वेगवेगळे रंगही दाखवतो. जीवनात प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते; ती कधी पटते तर कधी पटत नाही. या वास्तवावरही सिनेमात हलक्या-फुलक्या अंदाजात प्रकाश टाकला आहे.(Aatali Batami Phutli Trailer)

Aatali Batami Phutli Trailer

या चित्रपटाची खासियत म्हणजे पहिल्यांदाच एकत्र झळकणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी आणि पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव. त्यांच्यासोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर यांसारखे कलाकारही आहेत. या दमदार कलाकारांची जुगलबंदी प्रेक्षकांना हसवून हसवून लोटपोट करेल, असा निर्मात्यांचा विश्वास आहे. 

Aatali Batami Phutli Trailer

दिग्दर्शक विशाल पी. गांधी सांगतात, “माझा जन्म मुंबईत झाल्यामुळे मला मराठी कलाकार आणि मराठी सिनेमाच्या विषयांबद्दल नेहमीच आकर्षण होतं. ‘आतली बातमी फुटली’मधून मी प्रेक्षकांना दर्जेदार आणि तितकाच मनोरंजक आशय देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सिच्युएशनल कॉमेडीपट प्रेक्षकांना नक्कीच भावेल.” सिनेमाच्या संगीतात ताजेपणा आहे. ‘सखूबाई’, ‘चंद्राची गोष्ट’, ‘जालीम सरकार’ आणि टायटल ट्रॅक ‘आतली बातमी फुटली’ अशी चार गाणी सोशल मीडियावर आधीच लोकप्रिय झाली आहेत. या गाण्यांना जावेद अली, सुनिधी चौहान, प्रेमराज सोनाली सोनावणे आणि एग्नेल रोमन यांनी स्वर दिले आहेत. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी एग्नेल रोमन यांनी सांभाळली आहे.(Aatali Batami Phutli Trailer)

============================

हे देखील वाचा: अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी टेलिकास्ट होणार ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा शेवटचा एपिसोड !

============================

कॉमेडी, थरार आणि संगीताची रंगतदार मेजवानी देणारा ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल. १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाची आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aatali batami phutli marathi movie aatali batami phutli movie trailer Celebrity Entertainment Marathi Movie Mohan Agashe Rohini Hattangadi siddharth jadhav
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.