Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला !
पती-पत्नीचं नातं विश्वासावर टिकलेलं असतं. पण जेव्हा नात्यात दुरावा निर्माण होतो, तेव्हा नातं उध्वस्त होण्यासाठी वेळ लागत नाही. अशाच एका जोडप्याच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे नवऱ्याने पत्नीच्या खुनाची सुपारी दिली आणि मग सुरू झाला संशय, फसवणूक आणि हास्याचा खेळ. या अनोख्या कथानकावर आधारित “आतली बातमी फुटली” या मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. टिझरमध्ये अभिनेता मोहन आगाशे यांचे प्रभावी संवाद, तर सिद्धार्थ जाधव यांची विनोदी देहबोली लक्ष वेधून घेते. संवादांमधून गंभीरता तर अभिनयातून गमतीचा ओघ पाहायला मिळतो. (Aatali Batmi Phutali Teaser)

चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांनी केलं असून, निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सुपारीच्या भोवती फिरणारी ही कहाणी एका वेगळ्याच शैलीत उलगडत जाते. “आतली बातमी फुटली” या चित्रपटात मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, सिद्धार्थ जाधव यांसारख्या दिग्गज कलाकारांची प्रमुख भूमिका असून, त्यांच्यासोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, आणि त्रिशा ठोसर हे कलाकारही झळकणार आहेत.

या चित्रपटाच्या संहितेपासून ते तांत्रिक बाजूपर्यंत सर्व काही उत्तम प्रकारे साकारण्यात आले आहे. कथा जैनेश इजरदार यांची असून, पटकथा आणि संवाद जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, अद्वैत करंबेळकर, आणि विशाल गांधी यांनी लिहिले आहेत. छायांकन अमित सुरेश कोडोथ, संकलन रवी चौहान, संगीत एग्नेल रोमन यांचं आहे. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांनी साकारली असून, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि तिजो जॉर्ज यांचं आहे. (Aatali Batmi Phutali Teaser)
=============================
हे देखील वाचा: ‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकात Dr. Girish Oak आणि Dr. Shweta Pendse पुन्हा एकत्र येणार !
=============================
चित्रपटाचा प्रॉडक्शन डिझाईन रवी नाईक यांचा असून, कास्टिंग जोकीम थोरास यांनी केलं आहे. कार्यकारी निर्माते अब्दुल खान, तर चित्रपटाचं वितरण फिल्मास्त्र स्टुडिओजकडून केलं जाणार आहे. १९ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणारा “आतली बातमी फुटली” हा चित्रपट निश्चितच प्रेक्षकांना एक वेगळी आणि झगमगती मनोरंजनाची मेजवानी देणारा ठरेल.