Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Aatli Batmi Futali: ‘सखूबाई’ गाण्यात दिसणार गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा !
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक प्रश्न सगळ्यांच्या ओठांवर होता की, “सखूबाई कोण?” लोक या गूढ नावामागची खरी ओळख जाणून घ्यायला उत्सुक होते. अखेर ही ‘आतली बातमी’ आता फुटली आहे, आणि उत्तर सगळ्यांच्या भुवया उंचावणारे आहे. सखूबाई ही कोणी साधीसुधी नाही, तर महाराष्ट्राची लाडकी, एनर्जेटिक नृत्यांगना गौतमी पाटील आहे. ‘आतली बातमी फुटली’ या आगामी मराठी चित्रपटातील पहिलं गाणं, ‘सखूबाई’ नुकतंच प्रदर्शित झालं असून त्याने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलाय. या गाण्यात गौतमी पाटील हिच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीचा पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव याने सुद्धा धमाकेदार एंट्री केली आहे. गाण्यातील दोघांची केमिस्ट्री, नृत्य आणि संवादफेक पाहून प्रेक्षक अक्षरशः ठेका धरायला भाग पडत आहेत.(Aatli Batmi Futali Movie)

वीजी फिल्म्स या बॅनरखाली साकारत असलेल्या या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांनी केलं आहे. ‘आतली बातमी फुटली’ १९ सप्टेंबरला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे, आणि त्याआधीच या गाण्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. गाण्याला एग्नेल रोमन यांनी संगीत दिलं असून चैतन्य कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेले बोल सोनाली सोनावणे हिने आपल्या दमदार आवाजात सादर केले आहेत. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राहुल ठोंबरे आणि तिजो जॉर्ज यांनी घेतली आहे. गौतमी पाटीलने या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ती केवळ सोशल मीडियाची स्टार नाही, तर तिचं ऑनस्क्रीन प्रेझेन्स आणि एनर्जी मोठ्या पडद्यावरही तितकीच प्रभावी आहे. सिद्धार्थ जाधवने आपल्या विनोदी आणि करिष्मादार शैलीने गाण्यात वेगळाच रंग भरलाय. हॉट आणि कूलचा तडका या गाण्यात पाहायला मिळतो.

चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांनी केली आहे. सहनिर्माते अम्मन अडवाणी, तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. कथेपासून संवादांपर्यंत चित्रपटामध्ये अनेक नामवंत कलाकार आणि तंत्रज्ञांनी योगदान दिले आहे – कथा जैनेश इजरदार, पटकथा अडवाणी, मुनतोडे, गांधी आणि इजरदार यांची आहे. संवाद जीवक मुनतोडे आणि अद्वैत करंबेळकर यांचे आहेत.(Aatli Batmi Futali Movie)
===============================
===============================
चित्रपटाचं छायांकन अमित कोडोथ, संपादन रवी चौहान, प्रॉडक्शन डिझायनिंग रवी नाईक, वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी, आणि कास्टिंग दिग्दर्शक जोकीम थोरास यांनी सांभाळले आहे. फिल्मास्त्र स्टुडिओज या चित्रपटाचं वितरण करणार आहे. ‘आतली बातमी फुटली‘ या चित्रपटाचं हे सखूबाई गाणं केवळ आयटम नंबर न राहता, प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनलं आहे. चित्रपटाची एकंदर टीम आणि कलाकार पाहता, हा सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत अनेक ‘बातम्या’ फुटतील आणि मराठी मनोरंजनविश्वात एक नवा उत्सव होईल, हे नक्की!