Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: राकेश ला लहानपणी होता ‘हा’ गंभीर

Rani Mukherjeeला लेक आदिराने लिहिलं भावनिक पत्र, म्हणाली, ‘आई-मुलगी आहोत…’

महानायक Dilip Kumar आणि गीतकार आनंद बक्षी यांच्या मैत्रीचा भावस्पर्शी

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक झळकणार शाहिद कपूरच्या O’Romeo चित्रपटात!

Vishal Nikam ने अखेर ‘सौंदर्या’चा चेहरा दाखवलाच!

इच्छाधारी Nagin पन्नास वर्षांची झाली!

रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 मध्ये विकी कौशलची एन्ट्री?

Mayasabha Trailer: जावेद जाफ्रीसोबत झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

 Lagnacha Shot Movie Trailer: नात्यांचा गोंधळ आणि विनोदाची मेजवानी घेऊन  येणाऱ्या

Bigg Boss Marathi 6 : राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिजित-सुखदाचा विशेष दिवाळी पाडवा

 अभिजित-सुखदाचा विशेष दिवाळी पाडवा
कलाकृती विशेष

अभिजित-सुखदाचा विशेष दिवाळी पाडवा

by Kalakruti Bureau 16/11/2020

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि कथ्थक नृत्यांगना, अभिनेत्री सुखदा खांडकेकर, मराठीतील एक रोमँटीक कपल अशी या दोघांची ओळख आहे. एकमेकांच्या व्यस्त वेळापत्रकामधून दोघेही एकमेकांसाठी आवर्जून वेळ काढत असतात. सात वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या जोडीने खास दिवाळी पाडव्याच्या जागवलेल्या आठवणी कलाकृती मीडियाच्या रसिकांसाठी.

बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त यादिवशी असतो. खांडकेकरांच्या घरी दिवाळी म्हणजे सगळ्यांनी एकत्र असणं हे महत्त्वाचं असतं. पुणे, नाशिक, मुंबई इथून अभिजीत आणि सुखदाचे कुटुंबिय एकत्र जमतं आणि दिवाळी साजरी होते. दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला आणि आपल्या वडीलांना ओवाळण्याची प्रथा आहे. सुखदाचे वडील गेल्यापासून ती तिच्या सासर्‍यांनाही ओवाळते. “मला डबल गिफ्ट मिळत असल्याने प्रत्येक पाडवा हा माझ्यासाठी स्पेशल असतो”, असं सुखदा सांगते.

सुखदाच्या सासर्‍यांना शॉपिंगची आवड असल्याने दरवर्षी पाडव्याला मोठ्या उत्साहाने खांडकेकर कुटुंब खरेदीसाठी एकत्र बाहेर पडतं. सासर्‍यांना सोनं, चांदी, हिरे अशा वस्तू सुखदाला भेट म्हणून देण्यास जास्त आवडतात. एकदा अशीच एक हिर्‍याची नथ घेण्यासाठी म्हणून सगळे दुकानात गेले. तेव्हाचा किस्सा सांगताना सुखदा म्हणाली, “आम्ही माझ्यासाठी नथ बघण्यासाठी एका दुकानात गेलो. मी एक नथ घालून पाहिली. आणि ती नाकातच अडकली. काही केल्या ती निघेना. तेवढ्यात इतर लोकांनी आम्हाला ओळखलं होतं. त्यामुळे त्यांना आमच्याबरोबर फोटो काढायचे होते. दुकानदाराला आम्हाला बुके द्यायचा होता. या सगळ्या सत्कार समारंभात माझं नाक नुसतं लालेलाल झालं होतं. शेवटी जवळपास अर्ध्या तासाने तार कापून ती नथ निघाली. हा पाडवा माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे”.

हे हि वाचा: ‘आतिषबाजीने’ रंगली मधुरा वेलणकर-साटमची दिवाळी

दिवाळीच्या पाडव्याविषयी अभिजीत खांडकेकर सांगतो, “दिवाळीमध्ये आम्ही जास्तीत जास्त वेळ कसा एकत्र घालवता येइल याचा विचार करत असतो. गेली चार वर्ष माझ्या मालिका चित्रीकरणामुळे माझी धावपळ होते. पण एकदा का सगळ्यांना भेटलो की सगळा शीण निघून जातो. पाडव्याचं म्हणाल तर मी अत्यंत भाग्यवान आहे कारण मला अतिश्य अल्पसंतुष्ट पत्नी मिळाली आहे. गिफ्ट काय आहे, किती महाग आहे यापेक्षा प्रेमाने  देण्याच्या भावनेला सुखदाच्या दृष्टीने जास्त महत्त्व  असतं.  त्यामुळे मला एकूणच अभ्यंगस्नान, फराळ, औक्षण, एकत्र जमून मजा मस्ती हा दिवाळीचा माहौलच आवडतो”.

या वर्षीच्या दिवाळीबद्दल अभिजीत आणि सुखदा म्हणाले, “यंदा सुखदाच्या हिंदी मालिकेचं शूटींग सुरू असल्याने आम्हाला कितपत वेळ एकत्र घालवता येणार ही शंका आहे. आम्ही शॉपिंगही ऑनलाइन केलं आहे. हे वर्ष शिकवून जाणारं आहे. पैशापेक्षा नाती महत्त्वाची हे या काळात कळलं आहे. दिवाळी आनंदाचा सण आहे. रोजचं घर चालवण्याची भ्रांत आहे अशांसाठी, आनंदापासून वंचित असलेल्या व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही यावर्षी करणार आहोत, कारण त्या आनंदी चेहर्‍यांमुळे जे घर उजळेल ते हजारो दिव्यांमुळे उजळणार नाही. त्यामुळे काळजी घेऊन, सुरक्षिततेचे नियम पाळून, साधेपणाने पण उत्साहाने दिवाळी साजरी करणार आहोत”.

मुलाखत आणि शब्दांकन : गौरी भिडे

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Diwali Entertainment Featured
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.