Abhijeet Sawant : जुन्या गाण्याला नवा साज;अभिजीत चाहत्यांना देणार सरप्राईज

Abhijeet Sawant : जुन्या गाण्याला नवा साज;अभिजीत चाहत्यांना देणार सरप्राईज
‘मोहब्बते लुटाऊंगा’ हे ऑलटाईम हिट गाणं गाणारा पहिला इंडियन आयडॉल गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी एक सुमधूर पर्वणी घेऊन येणार आहे. नुकताच मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात आणि हिंदी मास्टरशेफमध्ये झळकलेला अभिजीत सावंत ‘चाल तुरु तुरु’ गाण्याला नवा साज देणार आहे. (Entertainment)

आजच्या तरुणाईला सुमधुर आवाजने वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका अभिजीत सावंत अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर अभिजीत एक खास गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. ‘चाल तुरु तुरु’ या जुन्या गाण्याचं खास नवीन व्हर्जन अभिजीत करणार आहे. २ मे २०२५ रोजी हे खास गाणं रिलीज होणार असून मूळ गाण्यापासून काहीतरी वेगळं अभिजीतच्या चाहत्यांना ऐकायला मिळणार यात शंका नाही. (Bollywood playback singer)
===============================
हे देखील वाचा: Ramayan : साई पल्लवीचे सीता मातेच्या गेटअपमधील फोटो आले समोर!
===============================
‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या शोचा विजेता बनून अभिजीतने इतिहास रचला. त्यानंतर अभिजीत सावंत रातोरात स्टार झाला. शो जिंकल्यानंतर अभिजीतचा पहिला सोलो अल्बम ‘आप का अभिजीत’ २००५ मध्ये आला होता. या अल्बममधील ‘मोहब्बतें लुटाउंगा’ आणि ‘लफ्जों में कह ना सकून’ ही गाणी खूप गाजली. (Abhijeet sawant songs)