Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Abhishek Bachchan एकेकाळी होता LIC Agent; चित्रपटांची गिनीज बुकमध्येही आहे नोंद

 Abhishek Bachchan एकेकाळी होता LIC Agent; चित्रपटांची गिनीज बुकमध्येही आहे नोंद
कलाकृती विशेष

Abhishek Bachchan एकेकाळी होता LIC Agent; चित्रपटांची गिनीज बुकमध्येही आहे नोंद

by रसिका शिंदे-पॉल 17/06/2025

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतायत… वय वर्ष ८२ असूनही आजही लीड हिरो म्हणून अमिताभ बच्चन काम करतायत… पण जितकं यश, प्रसिद्धी आणि फॅन फॉलॉईंग अमिताभ यांना मिळाली आणि कमवता आली तितकी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला कमावता आली नाही असं म्हटलं गेलं…मात्र, नेपोटिझमच्या आरोपांना मागे टाकत किंवा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत अभिषेक बच्चन याने आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे… विशेष म्हणजे २००० मध्ये ‘रेफ्युजी’ (Refugee) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी अभिषेक एक LIC एजंट होता… कसा होता त्याचा प्रवास जाणून घेऊयात…(Bollywood News)

स्टार किड असल्यामुळे अभिषेककडून चांगलं आणि बेस्ट कामचं सादर केलं पाहिजे अशी अपेक्षा केली जात होती. आणि बेस्ट आऊटकम देण्याच्या दडपणाखाली अभिषेक बच्चन त्याला ऑफर केले जाणारे प्रत्येक चित्रपट स्वीकारत होता.. अशावेळी स्क्रिप्ट काय आहे किंवा आपला रोल किती महत्वाचा आहे यावर भर देण्यापेक्षा ते चित्रपट करत राहणे याकडे अभिषेकच लक्ष असल्यामुळे त्याचा करिअरवर फार परिणाम झाला… ४ वर्षात अभिषेकने सलग १७ चित्रपट फ्लॉप दिले…यात ‘बस इतनासा ख्वाब है’, ‘खेले हम जी जान से’, ‘गेम’ अशा बऱ्याच चित्रपटांचा समावेश होता…(Entertainment)

मात्र, २००४ मध्ये आलेला ‘धुम’ (Dhoom Movie) चित्रपट अभिषेकच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला.. आणि त्यानंतर ‘बंटी और बबली’, ‘युवा’, ‘ब्लफमास्टर’, ‘गुरु’ आणि ‘दोस्ताना’ यांसारखे हिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये डळमळीत झालेलं स्वत:च स्थान सावरलं… यात मग ‘रावण’ चित्रपटातील त्याची प्रेक्षकांना हलवून टाकणारी भूमिका असो किंवा पा चित्रपट असो.. अभिषेक आपल्यातील कलाकाराला चॅलेंज देत नवे चित्रपट आणि भूमिका सादर करत राहिला…(Latest Entertainment news)

अभिषेक बच्चन बद्दल आणखी एक गोष्ट फार लोकांना कदाचित माहित नसेल… पण त्याला लहानपणापासून डिस्लेक्सिया होता. डिस्लेक्सिया या आजारात मुलांना लिहिताना, वाचताना आणि इतर गोष्टी करताना अनेक अडथळे येतात. याच अडथळ्यांचा सामना अभिषेक बालपणी करत होता.. त्याचं शालेय शिक्षण जमनाबाई नरसी स्कूलमधून झालं. आणि त्यानंतर तो अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात व्यवसाय अभ्यासक्रमासाठी गेला. पण शेवटी अमिताभ बच्चन यांचं रक्त अंगात सळसळत असल्यामुळे शिक्षम अर्धवट सो़डून तो अभिनयाकडे कायमचा वळला…

मात्र, कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अभिषेक एक LIC एजंट म्हणून काम करत होता. खरं तर ही गोष्ट फार कमी जणांना माहित आहे. अभिषेकने एका एलआयसी एजंटचंदेखील काम केलं आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अभिषेक बच्चनचं नाव गिनीज बुकमध्ये देखील नोंदवण्यात आलं आहे. ‘दिल्ली ६’ (Delhi 6 Movie) चित्रपटादरम्यान तब्बल १२ तासांहून अधिक वेळासाठी पब्लिक अपियरंस आणि ‘पा’ चित्रपटातील रिव्हर्स भूमिकेमुळे अभिषेकचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेलं आहे.

================================

हे देखील वाचा: Ranbir Kapoor-Alia Bhatt : बॉलिवूड कलाकारांचे रिलेशनशिप्स आणि….

=================================

अभिषेक बच्चनने आत्तपर्यंत ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘ओम जय जगदीश’, ‘Line Of Control : Kargil’, ‘युवा’, ‘सरकार’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘सरकार राज’, ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘हाऊसफुल्ल फ्रेचायझी’, ‘दसवी’, ‘घुमर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. तसेच, लवकरच, अभिषेक पहिल्यांदाच ‘राजा शिवाजी’ (Raja Shivji Movie) या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. रितेश देशमुख याचं दिग्दर्शन असणाऱ्या या मराठीतील पहिल्या भव्य-दिव्य ऐतिहासिक चित्रपटात अभिषेक बच्चनसह जिनिलिया देशमुख, महेश मांजरेकर, भाग्यश्री, सचिन खेडेकर, संजय दत्त, फरदीन खान जितेंद्र जोशी अशी तगडी स्टार कास्ट असणार आहे. (Abhishek Bachchan Movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan Amitabh Bachchan Bollywood Bollywood Chitchat bollywood latest news Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News doom Entertainment entertainment masala entertainment tadaka raavan raja shivaji movie refugee
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.