Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Abhishek Bachchanने ऐश्वर्या राय सोबतच्या घटस्फोटांवर अखेर मौन सोडलंच; म्हणाला तिला माझं सत्य…

 Abhishek Bachchanने ऐश्वर्या राय सोबतच्या घटस्फोटांवर अखेर मौन सोडलंच; म्हणाला तिला माझं सत्य…
मिक्स मसाला

Abhishek Bachchanने ऐश्वर्या राय सोबतच्या घटस्फोटांवर अखेर मौन सोडलंच; म्हणाला तिला माझं सत्य…

by रसिका शिंदे-पॉल 11/12/2025

बॉलिवूडमध्ये २०२५ या वर्षात बऱ्याच कलाकारांची लग्न झाली आणि काहीचे घटस्फोटही झाले… पण हे वर्ष ज्यांच्या घटस्फोटांच्या बातम्यांनी गाजलं ते म्हणजे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwerya Rai-Bachchan)… सोशल मिडियावर ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे राहात असल्याच्या बातम्यांनाही उधान आलं… मात्र, या सगळ्यावर दोघांनीही काहीच प्रतिक्रिया अद्याप दिली नव्हती… आता अखेर या वाढत्या चर्चांमुळे अभिषेक बच्चन याने घटस्फोटावर मौन सोडलं आहे… नेमकं तो काय म्हणाल आहे जाणून घेऊयात…

अभिषेक बच्चन याने त्याच्या आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाबद्दल काय म्हटलं आहे हे जाणून घेण्याआधी या चर्चा नेमक्या कधी सुरु झाल्या यावर एक नजर टाकूयात… तर राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याला ऐश्वर्या राय हिने बच्चन कुटुंबासोबत एन्ट्री न घेता मुलगी आराध्यासोबत वेगळी उपस्थिती सोहळ्याला लावल्यामुळे लोकांच्या भूवय्या उंचावल्या आणि अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली… यानंतर काही कौटुंबिक कार्यक्रमांना ऐश्वर्या-अभिषेक एका फ्रेममध्ये दिसले होते पण तरीही त्यांच्यात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात होतंच…  (Aishwerya & Abhishek Bachchan Divorce News)

आता यावर पीपींगमुनला प्रतिक्रिया देताना अभिषेक म्हणाला आहे की, “लग्नाच्या आधी त्यांना आमचं लग्न कधी होणार हे जाणून घ्यायचं होतं. आता ते घटस्फोटाच्या चर्चा करत आहेत. माझ्या पत्नीला माझं सत्य माहीत आहे. मला तिच्याबद्दल माहीत आहे. आम्ही एक आनंदी आणि परिपूर्ण कुटुंब आहोत आणि आमच्यासाठी हेच महत्त्वाचं आहे”. (Entertainment News)

पुढे अभिषेक म्हणाला की, “मी खूप नम्रतेने आणि सन्मानाने हे सांगू इच्छितो की मीडिया चुकीच्या गोष्टी पसरवत आहे. मीडिया देशाचा आत्मा आहे. आजच्या जगात तुम्हाला सगळ्यात आधी न्यूज द्यायची असते. मी तुमच्यावर असलेला दबाव समजू शकतो. पण, तुम्ही हे सगळं कशासाठी करत आहात? तुम्ही कुणाच्यातरी वैयक्तिक जीवनाबद्दल बोलत आहात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कुणाचा तरी नवरा, वडील असल्याच्या नात्याने मला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जर तुम्ही माझ्या कुटुंबाबाबत चुकीचं बोललात तर तुम्हाला याचा सामना करावा लागेल. कारण, माझ्या कुटुंबाबाबत काहीही चुकीचं मी सहन करणार नाही”… मला तिचं सत्य माहित आहे आणि तिचं मला त्यामुळे आमच्यात काहीही बिनसलं नाहीये असा खुलासाही त्याने यावेळी केला…

================================

हे देखील वाचा : Aishwerya Rai ते आलिया भट्ट; अर्ध्यातच कलाकारांनी सोडले ‘हे’ सुपरहिट चित्रपट!

================================

आता, अभिषेक बच्चन याने त्याच्या वैवाहिक जीवनात कसलीच अडचण नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना इथेच पुर्णविराम लागेल अशी अपेक्षा आहे… त्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच अभिषेक रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे… त्याच्यासोबत या चित्रपटात रितेश देशमुख, भाग्यश्री, संजय दत्त, सलमान खान, महेश मांजरेकर, जिनिलिया देशमुख असे बरेच कलाकार झळकणार आहेत…. (Abhishek Bachchan movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan abhishek bachchan and aishwerya rai divorce aishwerya rai Amitabh Bachchan Bollywood Bollywood Chitchat bollywood update Entertainment News raja shivaji movie Riteish Deshmukh salman khan Vivek Oberoi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.