‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Kaalidhar Laapata : अभिषेक बच्चनच्या कामाचं प्रेक्षकांसह बिग बींनीही केलं कौतुक!
हाऊसफुल्ल ५ चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरेत आलेला अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) त्याच्या आगामी कालिधर लापता चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. कॉमेडी भूमिका जरी अभिषेक बऱ्यापैकी साकारत असला तरी दसवी, पाँ किंवा कालिधर लापता अशा चित्रपटांमध्ये त्याला त्याचं अभिनय कौशल्य खऱ्याअर्थाने प्रेक्षकांसमोर अधिक प्रभावीपणे मांडता येतं… नुकताच अभिषेक बच्चन याच्या ‘कालिधर लापता’ (Kaalidhar Laapata) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षक त्याच्या कामाचं कौतुक करत आहेत…(Bollywood)

अभिषेक बच्चन याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘कालिधर लापता’ चित्रपटाची कथा मध्यमवयीन पुरुष आणि एका लहान मुलाच्या मैत्रीभोवती फिरते… चित्रपटात माणसाच्या आयुष्यातील दु:ख, आनंद, लोभ अशा विविध भावनांचा एक वेगळा आणि अलौकिक प्रवास या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे… आजूबाजूच्या गर्दीच्या लोंढ्यात भावंडांच्या क्रुर योजनेमुळे कालिधर स्वत:च्या मर्जीने गायब होण्याचा निर्णय घेतो आणि योगायोगाने एका लहान मुलाशी त्याची भेट होते आणि त्यांच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरु होतो… पुढे आता तो त्याच्या घरच्यांना सापडणार की नाही? आणि नेमकं कथानक कोणतं वळण घेणार हे चित्रपट पाहिल्यावरच समजणार आहे…(Bollywood News)

दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरचं आणि अभिषेकच्या कामाचं लोकं कौतुक करत असताना वडिल अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक खास पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे…बिग बी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की,अभिषेक, माझ्या प्रार्थना तुझ्यासोबत आहेत.. वेगवेगळ्या भूमिका आणि चित्रपट निवडण्याची आणि त्यात स्वतःला झोकून देण्याची तुझी क्षमता.. यशस्वी हो.. प्रेम आणि आशिर्वाद”.(Entertainment Tadaka)
================================
हे देखील वाचा: Abhishek Bachchan एकेकाळी होता LIC Agent; चित्रपटांची गिनीज बुकमध्येही आहे नोंद
=================================
‘कालिधर लापता’ चित्रपटाचं दिग्दर्शन उमेश बन्सल यांनी केलं आहे. अभिषेक बच्चनसोबत या चित्रपटात मोहम्मद झीशान अय्युब आणि दैविक भागेला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी झी ५ या ओटीटी वाहिनीवर रिलीज होणार आहे…(Bollywood Masala)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi