राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Deepika Padukone ते आलिया भट्ट; बॉलिवूड कलाकारांनीही सामना केलाय ‘या’ आजारांचा
बॉलिवूड कलाकार ग्लॅमरस लाईफ जरी जगत असले तरी त्यांचा वैयक्तिक आणि शारीरिक स्ट्रगल फार कमी लोकांना माहित असतो… तासंतास काम करणारे आपले लाडके सेलिब्रिटी लहानपणी काही mental किंवा physical disorders चा सामना करुन बाहेर आले आहेत हे तुम्हाला माहित आहे का…अलीकडे सेलिब्रिटी मेन्टल इलनेस (Mental Illness) किंवा त्यांच्या आजारपणाबद्दल उघडपणे बोलताना दिसतात… मग यात कॅन्सर, डिप्रेशन किंवा अन्य काही हेल्थ इश्यूझबद्दलही बोललं जातं.. (Bollywood news)

काही दिवसांपूर्वीच ‘सितारे जमीन पर’ (Sitare Zameen Par) चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खानने (Aamir Khan) पहिल्यांदाच त्याला मुलगा जुनेद (Junaid Khan) लहानपणी डिसलेक्सिक (Dyslexic) होता असल्याचं म्हणाला.. ‘तारे जमीन पर’ (Taar Zameen Par movie) चित्रपटाची कथा ऐकून इशान अवस्थी आणि त्याच्या वडिलांमध्ये त्याने स्वत:ला आणि जुनेदला पाहिल्याचं त्याने कबूल केलं होतं.. तसेच अभिषेक अमिताभ बच्चन (Abhishek Bachchan) यालाही लहानपणी डिस्लेक्सिया होता.. या आजारामुळे त्याला acedemic difficulties फार आल्या होत्या… तर बोमन इराणी (Boman Irani) यांनीही डिस्लेक्सियाचा सामना केला होता.. शाळेत बोलताना ते अडखळायचे आणि त्यांची मुलं फजिती उडावायचे असंही त्यांनी उघडपणे सांगितलेलं…(Entertainment)

इतकंच नाही तर हॉलिवूडलाही आपल्या डिरेक्शनने वेड लावणारे शेखर कपूरही (Shekhar Kapur) डिसलेक्सिक होते… तर ह्रतिक रोशन याला बालपणी speech disorder होता.. तो बोलताना फार अडखळायचा ज्याला आपण stammering असं म्हणतो.. मात्र उपचाराने तो या आजारातून बरा झाला.. तसेच, आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला ADHD Attention deficit hyperactivity disorder होता.. मुलाखतींमध्ये तिने या आजारामुळे तिला सायकोलॉजिकल ट्रिटमेंट घ्यावी लागली होती असंही ती म्हणाली होती..(Latest Entertainment news)
================================
हे देखील वाचा: Shekhar Kapur : हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणारा भारताचा ग्रेट डिरेक्टर!
=================================
बरं.. केवळ लहानवयातच नाही तर फेमच्या अगदी टोकाला उभं असतानाही शाहरुख किंवा दीपिका पादूकोणसारख्या कलाकरांनी डिप्रेशनचा सामना केला आहे… कारण एकदा का नावलौकिक मिळालं की तुमचं स्टारडम कायस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी कलाकाराला अधिक मेहनत करावी लागते… आणि जर का स्टारडम टिकलं नाही किंवा मेन्सल ब्रेकडाऊन झाला तर सेलिब्रिटी डिप्रेशनमध्ये जातात… आणि याच डिप्रेशनचा सामना दीपिका पादूकोण, ह्रतिक रोशन (Hrithik Roshan), करण जोहर, अनुष्का शर्मा, मनीषा कोयराला, परिणीती चोप्रा अशा बऱ्यात कलाकारांना डिप्रेशन आणि Anxiety अॅटॅक्स आले आहेत… त्यामुळे आज जरी शाहरुख पासून ते सलमानपर्यंत सगळेच स्टार कलाकार lavish life जगत असले तरी त्यांच्याही पर्सनल आयुष्यात त्यांचा mental, physical स्ट्रगल सुरुच आहे हे डावलून चालणार नाही…(Bollywood celebrities and their mental illness)

रसिका शिंदे-पॉल
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi