‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

२५ वर्षात पहिल्यांदा मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार Abhishek Bachchan याने कुणाला केला समर्पित?
मनोरंजनसृष्टीतील प्रतिष्ठित मानला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award 2025) सोहळा नुकताच संपन्न झाला… ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या सगळ्याच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती… यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदाच अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला… २५ वर्षांच्या कारकिर्दितील त्याला हा पहिला पुरस्कार त्याने त्याच्या जीवनातील खास व्यक्तींना समर्पित केला आहे… (Bollywood)

अभिषेक बच्चन याला ‘I Want To Talk’ चित्रपटासाठी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे…विशेष म्हणजे वडील अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी त्याला या पुरस्काराच्या रुपाने खास गिफ्ट मिळालं अशी भावनाही त्याने व्यक्त केली… दरम्यान, हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अभिषेक भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या… तो म्हणाला की, “इंडस्ट्रीत येऊन मला २५ वर्षं पूर्ण झाली. मी किती वेळा या पुरस्कारासाठी भाषणाची तयारी केली होती, तेच लक्षात नाही. आज हे स्वप्न पूर्ण झालं आहे. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कुटुंबीयांसमवेत मला हा पुरस्कार मिळणं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.” (Entertainment News)

पुढे अभिषेक असं देखील म्हणाला की, “माझ्या सर्व दिग्दर्शक, निर्माते आणि सहकलाकारांचे आभार. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला नवीन संधी दिल्या. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता; पण त्या सगळ्या प्रवासाचं फळ आज मला मिळालं आहे, असं वाटतं. हा पुरस्कार म्हणजे २५ वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या.” (Abhishek Bachchan Filmfare award 2025)
================================
हे देखील वाचा : Isha Deol : अभिषेक बच्चन जावई व्हावा अशी होती हेमा मालिनींची इच्छा!
================================
तसेच, अभिषेकने त्याचा पहिसा फिल्मफेअर पुरस्कार पत्नी ऐश्वर्या, मुलगी आराध्या आणि वडिल अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना समर्पित केला… तो म्हणाला की, “ऐश्वर्या आणि आराध्या, मला माझी स्वप्नं पूर्ण करू दिल्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. या पुरस्कारामागे तुमचा खूप मोठा त्याग आहे. हा पुरस्कार मी खास व्यक्तींना अर्पण करतो आणि त्या व्यक्ती म्हणजे माझे वडील व माझी मुलगी.” दरम्यान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) (चंदू चॅम्पियन) या दोघांना विभागून देण्यात आला… तसेच, येत्या काळात अभिषेक बच्चन शाहरुख खान आणि सुहाना खान यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘किंग’ (King movie) चित्रपटात दिसणार आहे… याशिवाय, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपटातही तो महत्वूर्ण भूमिका साकारणार आहे… (Abhishek Bachchan movies)
‘It’s Not Been Easy’: Abhishek Bachchan Gets Emotional After Best Actor Win, Thanks Wife Aishwarya Rai
Abhishek Bachchan won his first-ever Best Actor award for I Want To Talk at Filmfare 2025. While getting emotional during his speech he thanked his wife Aishwarya Rai and Aaradhya.