Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

भारत सोडून दुबईत शिफ्ट होतोय Pushkar Jog?
एकीकडे मराठी कलाकार मराठी चित्रपटांसोबत किंवा मराठी चित्रपटसृष्टीपासून जरा लांब जात हिंदी किंवा इतर भाषेत पलं प्रस्त मांडताना दिसत आहेत… अशातच मराठी अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग आता थेट UAE देशाचा नागरिक झाल्याचं समोर आलं आहे… सोशल मिडियावर कायम आपली मतं माडणाऱ्या पुष्कर जोगच्या या निर्णयामुळे सगळेच थक्क झाले आहेत… जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण?
तर, अभिनेता पुष्कर जोग याने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्याला संयुक्त अरब अमीरात देशाचा गोल्डन व्हिसा मिळाल्याचे त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. 3 नोव्हेंबर रोजी त्याने फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली.

पुष्कर जोग याने फोटो शेअर करत लिहिले की, “मला माझा गोल्ड व्हिसा मिळाला, त्यामुळे मी आता अधिकृतपणे युएइचा नागरिक आहे. हे सगळं मी माझ्या मुलीसाठी केलं आहे. तिच्या आनंदासाठी तिच्या कल्याणासाठी आणि तिच्या भविष्यासाठी… धन्यवाद आई बाबा आणि अमोल जोग तसेच देवाचेही आभार…”
दरम्यान, Pushkar Jog च्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. काहीजणांनी त्याचं अभिनंदन केलं आहे तर काहींनी त्याला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, इथे पैसे कमवून, इथे मोठे होऊन, बाहेरच्या देशाचे कसे नागरिकत्व मिळवले हे सांगण्यात काय महान कामगिरी केलीय? मी तर म्हणते तुमच्या सारख्या लोकांना इथे परत कुणी कामच देऊ नये,तिथेच काही मिळतंय का बघा काम. आणि all for my daughter म्हणताय, शेवटी मुस्लिम कंट्री आहे ती तिथे मुलगी सुरक्षित असणार आहे हिंदू राष्ट्रापेक्षा? खरच तुमच्या या असल्या विचारसरणीचे कौतुक करावे का कीव करावी हेच कळत नाही.पुन्हा भारतात तोंड दाखवले नाहीत तर बरे होईल. तर आणखी एकाने लिहिले, झाले ते चांगले आहे.. पण आपल्या प्रांतात कसली कमतरता आहे… शिक्षण की संस्कार?…
================================
हे देखील वाचा : Human Cocaine : पुष्कर जोगचा नवा लूक; वास्तव कल्पनेपेक्षा अधिक भयानक असलेला थरारकपट
================================
आता पुष्कर जोग खरंच भारत आणि महाराष्ट्र सोडून अरब देशात सेटल झाला आहे की हा कोणता स्टंट आहे हे कळायला काही मार्ग नाही… त्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास लवकरच तो ‘ह्युमन कोकेन’ या चित्रपटात तो हटक्या अंदाजात दिसणार आहे… हा चित्रपट त्याचीच निर्मिती असून १६ जानेवारी २०२६ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi