
Ashutosh Rana : “भाषा हा संवादाचा विषय, वादाचा नाही”; मराठी-हिंदी भाषा वादावर राणांची प्रतिक्रिया
राज्यात सध्या सुरु असलेल्या मराठी-हिंदी भाषा वादावर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांची मतं मांडत आहेत…आता या वादात अभिनेते आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी उडी मारली असून भाषा हा संवादाचा विषय आहे वादाचा नाही असं स्पष्ट शब्दांत त्यांनी आपलं मत मांडलं आहे…
आशुतोष राणा सध्या त्यांच्या ‘हिर एक्सप्रेस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या कार्यक्रमावेळी त्यांनी भाषा वादावर मत मांडलं. आशुतोष म्हणाले की,”माझ्या मुलांची भाषा ही मराठी आहे. शिवाय माझ्या पत्नीचीही मातृभाषा मराठीच आहे. माझं वैयक्तिक असं मत आहे की, भाषा हा संवादाचा विषय आहे. भाषा कधीही वादाचा विषय नसते. भारत हा एक महान देश आहे. जिथे सर्व गोष्टींचा स्वीकार करण्यात आला आहे आणि या देशात संवादावर विश्वास ठेवला जातो. भारत वादावर विश्वास ठेवणारा देश नाही.”

दरम्यान, या आधी शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, अजय देवगण, जान्हवी कपूर यांनी देखील मराठी-हिंदी भाषेवर आपली मतं व्यक्त केली होती. सगळ्या भाषांचा आदर केलाच पाहिजे आणि महाराष्ट्रात राहून मराठी आलीच पाहिजे हा अट्टाहास प्रत्येक कलाकाराचा होता… त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मराठी भाषेच्या अस्तित्वावर आपली मतं मांडत आहेत हे सुखदायी चित्र नक्कीच आहे…
================================
हे देखील वाचा : Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”
=================================
आशुतोष राणा यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर आजवर त्यांनी ‘दुश्मन’, ‘गुलाम’, ‘कलयुग’, ‘वॉर’, ‘छावा’, ‘टायगर ३’, ‘पठाण’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.. तसेच , भविष्यात आशुतोष राणा यांना त्यांच्या पत्नी रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांच्या सोबत एकाच चित्रपटात पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे; आता ही इच्छा पुर्ण होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi