Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vadalvaat मालिकेच्या शीर्षक गीताची अनटोल्ड स्टोरी!

Karz movie : ऋषी कपूर-टीना मुनीमचा म्युझिकल हिट ’कर्ज’!

Gulkand ची १ महिन्यानंतरही थिएटरमध्ये जादू; जाणून घ्या बॉक्स ऑफिस

Squid Game 3: पुन्हा फासे पलटणार; येणार नवा ट्विस्ट!

Aamir Khan : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बॉलिवूडमधून एक्झिट घेणार?

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेत ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार ‘भगवान शिवशंकर’ !

 ‘उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेत ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार ‘भगवान शिवशंकर’ !
Devdatta Nage as Bhagwan Shivshankar
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेत ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार ‘भगवान शिवशंकर’ !

by Team KalakrutiMedia 02/09/2024

विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.( Devdatta Nage as Bhagwan Shivshankar)

Devdatta Nage as Bhagwan Shivshankar
Devdatta Nage as Bhagwan Shivshankar

साडेतीन शक्तिपीठांचा महिमा जाणून घेण्यासाठी मुळात त्यांची निर्मिती कशी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच शक्तिरूप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात होईल. सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकर साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर तो स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे. देवयानी या मालिकेत देवदत्त याने साकारलेल्या सम्राटराव विखे-पाटील या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. देवयानीनंतर तो पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत जोडला जातोय.

Devdatta Nage as Bhagwan Shivshankar
Devdatta Nage as Bhagwan Shivshankar

उदे गं अंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना देवदत्त नागे म्हणाले, ‘टीव्ही माझं अत्यंत आवडीचं माध्यम आहे. कारण टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांच्या फक्त घरात नाही तर मनात देखिल पोहोचता. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेने मला अभिनेता म्हणून ओळख दिली. जवळपास १० वर्षांनंतर मी पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत काम करतोय. प्रेक्षकांपर्यंत मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो. शिव-शक्तीचं नातं अतूट आहे.'(Devdatta Nage as Bhagwan Shivshankar)

============================

हे देखील वाचा: ‘वीर मुरारबाजी’ १४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर; अभिनेते सौरभ राज जैन साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

============================

‘जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे. त्यामुळे साडे-तीन शक्तीपीठींच्या या गोष्टीमध्ये शिवशंकराचे नेमके कोणते अवतार होते आणि त्यामागे नेमकी कोणती कथा दडली आहे हे या मालिकेतून साकारण्याचा प्रयत्न असेल. महादेवांपुढे श्रद्धेने लीन होऊन या नव्या प्रोजेक्टची सुरुवात करतोय. प्रेक्षकांचा आशीर्वाद आणि प्रेम दोन्ही मिळावं हीच अपेक्षा आहे.; असे ही देवदत्त नागे म्हणाले.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Actor Devdatta Nage Celebrity Devdatta Nage as Bhagwan Shivshankar Entertainment Marathi Serial sade teen shaktipeeth Star Pravah star pravah new serial ude ga ambe katha sade teen shaktipeethanchi serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.