Hum : एका सिनेमासाठी रेकॉर्ड केलेले गाणे वापरले दुसऱ्या सिनेमाला
Farhan Akhtar पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकवणारा प्रतिभावान दिग्दर्शक, अभिनेता फरहान अख्तर
बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभासंपन्न अभिनेता, दिग्दर्शक, गायक, संगीतकार फरहान अख्तर (Farhan Akhtar) कोणाला माहित नाही असे शक्यच नाही. त्याने दिल चाहते है पासून ते अगदी तुफानपर्यंत प्रत्येक चित्रपटातून त्याने त्याच्या प्रभावी अभिनयाने, दिग्दर्शनाने प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली. दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारा फरहान अगदी लीलया अभिनयात आला. आज तो एक यशस्वी दिग्दर्शकासोबतच एक उत्तम अभिनेता म्हणून देखील ओळखला जातो. (Actor, Director Farhan Akhtar)
आज बॉलिवूडचा मिल्खा सिंग अर्थात फरहान अख्तर त्यांचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. फरहानला चित्रपटांचा वारसा किंवा चित्रपटांचे वातावरण लहान असल्यापासून घरातूनच मिळाले. त्याचे वडील प्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि लेखक जावेद अख्तर आहे. तर आई हनी इराणी. (Farhan Akhtar Birthday)
फरहानला चित्रपटांची पार्श्वभूमी असूनही या सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत आणि संघर्ष करावा लागला. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी फरहानने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. १९९१मध्ये त्याने ‘लम्हे‘ (Lamhe) चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तर १९९७मध्ये त्याने दिग्दर्शक पंकज पराशर यांच्या ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. (Farhan Akhtar News)
चित्रपटांसाठी त्याने शिक्षण अर्ध्यातच सोडले. मात्र अनेक वर्ष तो घरात बेकार बसून राहिला. या काळात त्याच्या आईने त्याला काही तरी काम कर नाहीतर घरातून हाकलून देईल अशी धमकी दिली. हे ऐकून फरहानने वडिलांप्रमाणे लिखाणास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या लिखाणातून तयार झाला बॉलिवूडमधील कल्ट सिनेमा ‘दिल चाहता है’ (Dil Chahta Hai).
सुरुवातीपासूनच फरहानचा चित्रपटांकडे कल होता. त्याने वयाच्या केवळ २८ व्या वर्षी दिग्दर्शनात पदार्पण केले आणि २००१ मध्ये आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना या तीन ताकदीच्या अभिनेत्यांसोबत ‘दिल चाहता है’ हा सिनेमा तयार केला. दिल चाहता है सिनेमा तुफान गाजला. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही या सिनेमाला डोक्यावर घेतले. (Entertainmnet Masala News)
आजही ‘दिल चाहता है’ हा सिनेमा, त्याची कथा, गाणी, संवाद सर्वच लोकप्रिय आहे. फरहानने त्याच्या पहिल्याच सिनेमासाठी थेट राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेयर पुरस्कार (National Award and Filmfeyar award) पटकावला. या सिनेमानंतर त्याची गाडी सुरु झाली. अजिबात घाई न करता वेळ घेऊन काम करण्यासाठी फरहान ओळखला जातो. कमी मात्र सर्वोत्कृष्ट कलाकृतीची त्याचे नाव आधी घेतले जाते. (Bollywood Masala)
दिल चाहता है नंतर त्याने २०२४ साली ऋतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांना घेऊन ‘लक्ष्य‘(Lakshya) हा सिनेमा तयार केला. या चित्रपट देखील कमालीचा गाजला. यातील गाणी देखील आजही लोकांच्या लक्षात आहे. दिग्दर्शनात यश मिळवत असताना फरहानने अभिनयात देखील नशीब अजमावण्याचे ठरवले. आणि २००७ साली आलेल्या ‘रॉक ऑन‘ (Rock On) या सिनेमातून त्याने अभिनयात पदार्पण केले. (Ankahi Baatein)
अभिषेक कपूरच्या रॉक ऑन या सिनेमाने आणि यातील गाण्यांनी नुसता धुमाकूळ घातला होता. सिनेमातील गाणी देखील तुफान हिट झाली. या सिनेमातून फरहानने ना केवळ अभिनेता तर एक गायक म्हणून देखील पदार्पण केले. त्याच्या या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला सोबतच फरहानला देखील या सिनेमासाठी अनेक पुरस्कार मिळाले. शिवाय त्याने त्याच्या ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमातील अभिनयासाठी देखील अनेक पुरस्कार जिंकले. (Farhan Akhatar Awards)
याशिवाय फरहानने ‘डॉन’, ‘डॉन 2’ चित्रपटांचे लेखन केले आहे. तर ‘डॉन’, ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर फरहानने ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘मिल्खा सिंग’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, वझीर, तुफान आदी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. फरहानने ‘ब्राइड अँड प्रिज्युडिस’ (Bride and Prejudice) या चित्रपटासाठी अनेक गाणी लिहिली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Bollywood News)
फरहान नेहमीच व्यवसायिक आयुष्यामुळे गाजत असतो. मात्र त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील मीडियामध्ये चर्चेचा विषय बनत आले आहे. फरहानने हेअर स्टायलिस्ट असणाऱ्या अधुना भवानीसोबत (Adhuna Bhabani) प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नाच्या १६ वर्षांनी २०१६ साली त्यांनी ते घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. त्यांना दोन मुली देखील आहेत.
=========
हे देखील वाचा : Farah Khan बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर फराह खानचा संघर्षमयी प्रवास
=========
पुढे फरहानचे नाव श्रद्धा कपूरसोबत देखील जोडले गेले. मात्र फरहानने २०२२ साली अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) लग्न केले. शिबानी आणि तो अनेक वर्ष नात्यात होते. फरहान अतिशय यशस्वी दिग्दर्शक आहे. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तर १५० पेक्षा जास्त कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. फरहान एका चित्रपटासाठी पाच ते सहा कोटी रुपये मानधन घेतो. फरहानचे वार्षिक उत्पन्न सुमारे २५ कोटी रुपये आहे. त्याशिवाय फरहान जाहिरातींसाठीही मोठी रक्कम आकारतो.
फरहानकडे याशिवाय त्याने प्रॉपर्टीमध्ये देखील मोठी गुंतवणूक केली आहे. त्याच्याकडे पोर्श केमन, रेंज रोव्हर, मर्सिडीज वेंज, होंडा सीआरव्ही आदी अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे.