Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

१४ जूनपासून अनुभवता येणार ‘अल्याड पल्याड’ चा थरार…

 १४ जूनपासून अनुभवता येणार ‘अल्याड पल्याड’ चा थरार…
Alyad Palyad Movie
मिक्स मसाला

१४ जूनपासून अनुभवता येणार ‘अल्याड पल्याड’ चा थरार…

by Team KalakrutiMedia 28/05/2024

आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल करताना थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड‘ हा थरारपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत.(Alyad Palyad Movie)

Alyad Palyad Movie
Alyad Palyad Movie

रहस्यमय गोष्टींचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. पोस्टरपासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रदर्शित झालेल्या या ट्रेलर मधून जबरदस्त झलक दिसून येत आहे. अल्पावधीतच हा ट्रेलर ट्रेंडिंगला आला आहे.  दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. एका रहस्याची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते.  सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेची  उकल कशी होते ? सत्य काय आहे? उत्कंठा, शोध, यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार? हे ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Alyad Palyad Movie
Alyad Palyad Movie

या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी यावेळी व्यक्त  केला. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

==================================

हे देखील वाचा: जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित ‘पुरुष’ वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

===================================

कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. वेशभूषा अपेक्षा गांधी तर ध्वनी स्वरूप जोशी  यांचे आहे. कार्यकारी निर्माते संतोष खरात आहेत.लाईन प्रोड्यूसर दिपक कुदळे पाटील आहेत. रंगभूषा अभिषेक पवार यांची आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. प्रोडक्शन मॅनेजरची  जबाबदारी  स्वानंद देव व विष्णू  घोरपडे यांनी सांभाळली आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actor gaurav mpre actress alyad palyad movie Entertainment gaurav more movie maharashyrachi hasyajatra makrand deshpande Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.