
Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”
मराठी चित्रपटांचं वेड अलीकडे बॉलिवूडलाही फार लागलं आरहे असं म्हणायला हरकत नाही… बरेच, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार साऊथ चित्रपटांसोबते मराठीतही कॅमिओ करताना दिसत आहेत… अशात नुकत्याच झालेल्या मराठी फिल्मफेअर २०२५ च्या पुरस्कार सोहळ्यात तब्बू, राजकुमार राव, जयदीप अहलावत यांच्यासह बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती.. यावेळी बॉलिवूड कलाकारांनी भरभरु मराठी चित्रपटांचं कौतुक केलं… अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मराठीत बॉलिवूडपेक्षा उत्तम चित्रपट बनतात असं मत व्यक्त केलं होतं… यानंतर आता जयदीप अहलावत याने देखील मराठीचं तोंडभरुन कौतुक केलं असून मला मराठी चित्रपट फार आवडतात असं म्हणत मराठीतला एक अजरामर चित्रपट हिंदीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जयदीप अहलावत यावेळी पुढे म्हणाला की, “मला मराठी सिनेमा खूप आवडतो. मी सुद्धा थिएटर केलं आहे. फिल्म इन्स्टिट्यूट पुणे येथे जेव्हा शिकत होतो तेव्हा मला जाणवलं की मराठी थिएटर किती स्ट्राँग आहे. मी चकितच झालो होतो. ‘किल्ला’ चित्रपट जो माझ्या मित्राने बनवला फारच सुंदर आहे. ‘नटसम्राट’ या चित्रपटाचा तर मी अजूनही तितकाच मोठा चाहता आहे. कधीही पाहिला तरी मी प्रभावित होतो. पुढे काही वर्षांनी संधी मिळाली तर मला नटसम्राट हिंदीत करायला आवडेल.”
================================
हे देखील वाचा: Nawazuddin Siddiqui : “बॉलिवूडपेक्षा मराठी उत्तम चित्रपट बनतात!”
=================================
खरंतर, आत्तापर्यंत मराठीतील काही गाजलेल्या चित्रपटांचे हिंदीत रिमेक करण्यात आले आहेत. अशात आता अहलावत याने इच्छा व्यक्त केल्यानुसार भविष्यात ‘नटसम्राट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक होण्याची आता प्रेक्षक नक्कीच वाट पाहात आहेत… दरम्यान, २०१६ मध्ये आलेल्या नटसम्राट चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं; आणि या चित्रपटात नाना पाटेकर, विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तसेच, त्यांच्यासोबत मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे,सुनील बर्वे, नेहा पेंडसे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका होत्या…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi