Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
Kiran Mane किरण मानेंना निळू फुलेंच्या नावाने पुरस्कार जाहीर, पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामाची पोचपावती म्हणून पुरस्कार (Award) प्रदान करण्यात येतो. आपल्या कामाचे चीज आणि पाठीवरील शाबासकीची थाप म्हणून, हे पुरस्कार सतत कलाकारांना अधिक उत्तम काम करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे प्रत्येक पुरस्कार कलाकारांसाठी खासच असतो. (Kiran Mane)
असाच एक अतिशय मोठा आणि खास पुरस्कार अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना जाहीर झाला आहे. मराठी चित्रपट आणि खासकरून मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते असलेल्या किरण माने यांना यंदाचा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Annabhau Sathe International Movie Festival) ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता’ (Nilu Phule Kalakar Karyakrta) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (Entertainment mix masala)
यंदा हे पुरस्काराचे पहिलेच वर्ष (First Year) आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट आणि या पोस्टमधून त्यांनी नाव न घेता इतर कलाकारांवर खोकच शब्दात टीका केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट खूपच गाजत आहे.
“हॅलो किरण माने सर… संदीप ससाणे बोलतोय. अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षीपासून ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार’ सुरू करतोय…पहिलाच पुरस्कार तुम्हाला द्यायचा यावर आमच्या निवड समितीचं एका क्षणात एकमत झालं. तुमच्या होकाराची अपेक्षा आहे.
काय उत्तर द्यावं सुचेनाच. आनंदानं मन भरून आलं, डोळे पाणावले. ‘अण्णाभाऊ-निळूभाऊ’ म्हणजे कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मला समृद्ध करणारे माझे आदर्श. निळूभाऊंना तर मायणीच्या तंबूत पाहिलेल्या ‘पिंजरा’पासून परिवर्तनाच्या चळवळीतल्या भाषणांपर्यंत मी वेड्यासारखं ‘फॉलो’ केलं…नंतरच्या काळात मला अल्पकाळ का होईना सहवास लाभला. चक्क सातारच्या माझ्या घरीही ते आले!
निळूभाऊंच्या नावानं पुरस्कारासारखं दुसरं सुख नाही…हे समजल्यापासून हवेत तरंगतोय…आजपर्यंत ज्या-ज्या अवार्डमधून कारस्थानानं माझा पत्ता कट झाला त्या सगळ्या ट्रॉफ्यांची किंमत एका फटक्यात शून्य करून टाकणारा हा बहुमान आहे. मराठी कलाक्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जे नाव आहे, त्या नावानं असलेला पुरस्कार हा मी तेवढ्याच रुबाबात आणि टेचात स्वीकारणार…कारण माझा संघर्ष मला सांगतोय… अभिनयासाठी मी खाल्लेल्या खस्ता मला सांगतायत… शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा प्रसार करतो म्हणून इंडस्ट्रीतल्या वर्चस्ववाद्यांनी माझ्या पोटावर मारलेली लाथ मला सांगतेय… त्यावेळचे माझ्या आईवडिलांच्या डोळ्यांतले अश्रू मला सांगतायत… की हो, मी हा पुरस्कार डिझर्व करतो.
निळूभाऊ, तुमच्यासमोर मी कायम नतमस्तक आहे. तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून प्रवास करत राहीन…तुम्ही आणीबाणीच्या काळात नागपूरच्या चौकात निडरपणे केलेलं भाषण असो… परिवर्तनाच्या चळवळीत केलेली व्याख्यानं असो…तथाकथित धर्मांध संस्कृतीरक्षकांना झुगारून केलेले ‘सखाराम बाईंडर’चे प्रयोग असोत…’कोण म्हणतं टक्का दिला’ सारखं दलित चळवळीच्या विचारांचं नाटक प्रोड्यूस करणं असो…’अभिनेत्याला समाजभान नसेल आणि भवताली घडणार्या अराजकावर बोलण्याचा निडरपणा नसेल, तर त्याची कला पोकळ आणि क्षुद्र ठरते’, हे तुम्ही मला शिकवलंय आणि मी ते शंभर टक्के अंगीकारलंय. सलाम निळूभाऊ.”
किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांचे भरभरून अभिनंदन केले आहे. दरम्यान किरण माने यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. सोबतच अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले असून, काही नाटकांमध्ये देखील ते झळकले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच किरण माने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट (Shivsena Udhav Thackery Gat ) या पक्षात प्रवेश करत त्यांच्या राजकीय प्रवासाला (Political Journey) सुरुवात केली आहे. किरण माने हे सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असून, ते सतत विविध पोस्ट शेअर करत लोकांच्या संपर्कात राहतात.