नयिकेची होणार खलनायिका! अभिनेत्री Akshaya Hindalkar ची होणार अबोली मालिकेत एण्ट्री…

Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
नुकतीच सामाजिक सुधारक (Social Worker) असलेल्या सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची जयंती झाली. क्रांतिज्योती असलेल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात झाला. सावित्रीबाई फुले या एक समाजसेविका, स्त्री मुक्ती चळवळीत सहभागी आणि देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. (Marathi News)
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. सावित्रीबाई आणि त्यांचे पती महात्मा फुले (Savitribai phule and Mahatma Phule) हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. (Kiran Mane )
एक शिक्षिका होण्यासोबतच सावित्रीबाई फुले यांनी अनेक समाजातील अनेक चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवत लोकांना जागरूक करण्याचे काम केले. सावित्रीबाई एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या (Savitribai Phule Birthday) निमित्ताने सोशल मीडियावर लोकांनी पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. अशातच अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून खास पोस्ट शेअर केली आहे. (Entertainment mix masala)
किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “स्त्रीने बालपणी पित्याच्या आज्ञेने आणि संमतीने वागावे. तिने कधीही स्वतःच्या मताने वागू नये. पिता, पती, पुत्र यांना सोडून स्वतंत्र राहणारी स्त्री दोन्ही कुळांना निंदनीय असते. पती हा मनाविरुद्ध वागला तरी पत्नीने प्रसन्न मुद्रेने राहावे. आपल्या पित्याने किंवा भावाने ज्याच्याशी लग्न लावले तो जिवंत असेपर्यंत त्याचीच सेवा करावी. त्याच्या मरणानंतरही तिने दुसरा नवरा करू नये. (Social News)
कारण लग्नामध्ये होम-हवन करुन तिला ज्याच्या ताब्यात दिले, तेच तिच्या पतीचे स्वामित्वाचे कारण आहे. पतीच तिचा मालक बनतो. त्याची आराधना व सेवा करावी पती दुर्व्यसनी असो किंवा परस्त्री गमन करणारा असो, त्याला विद्या नसली, अपंग असला तरी तिने त्याला देवासामान मानावे. स्त्रियांना पतीखेरीज दुसरा देव नाही.
पतीसेवा हिच तिला स्वर्गप्राप्तीचे एकमेव साधन आहे. तिने पती निधनानंतर अल्प आहार करावा. ब्रह्मचर्य पाळावे. कारण ब्रह्मचर्यामुळे स्वर्ग मिळतो.” मनुस्मृतीतल्या पाचव्या अध्यायातल्या फक्त १४८ ते १५५ क्रमांकांच्या श्लोकांची ही झलक आहे मित्रांनो! बाकी संपूर्ण बारा अध्यायांच्या ग्रंथात, “स्त्रीचा वापर प्रजननासाठी कसा करावा. (Latest Marathi News)
उच्चवर्णीय पुरूष जेवायला बसलेला असताना डुक्कर, कुत्रा, शूद्र, षंढ आणि रजस्वला (मासिक पाळी आलेली) स्त्री यांना त्याच्या नजरेसमोर आणू नये. उच्चवर्णीय पुरूष जेवण करून निघून गेल्यावर, जमिनीवर पडलेले उष्टे अन्न त्यांनी ‘प्रसाद’ म्हणून खावे…” अशी विकृत घाण भरलेली आहे. याच मनुस्मृतीला महात्मा फुले यांनी “स्त्रीयांना आणि शुद्रांना गुलामगिरीत लोटणारा एक नंबरचा शत्रू” म्हणून उडवून लावले. (Social Media Post)
पत्नी सावित्रीबाईंना शिक्षणाचे, आचारविचारांचे पूर्ण स्वातंत्र्य दिले… याचा सावित्रीबाईंनी समाजातल्या इतर स्त्रीयांसाठी पुरेपुर उपयोग केला. मनूवाद्यांच्या जोखडात अडकलेल्या स्त्रीया आणि शूद्रातिशूद्रांना मुक्त करण्यासाठी पतीसोबत घर सोडले. मनूवाद्यांच्या अर्वाच्य ट्रोलिंगला जुमानले नाही. शेण, दगडगोट्यांचा मारा झेलला… मागे हटल्या नाहीत ! आई, तुझे आभार कसे मानू? कुठल्या शब्दांत मानू? तुला त्रास देणार्या मनूवादी लोकांची पिलावळ आज विद्येची देवता म्हणुन सरस्वती देवीला पुजते.
============
हे देखील वाचा : Omkarnath Thakur: ‘या’ हुकुमशहाच्या निद्रानाशाचा विकार बरा केला संगीतकाराने !
============
पण तुझी मात्र ते आजही हेटाळणी करतात. खरंतर त्यांच्या घरातल्या महिलाही आज ज्या स्वातंत्र्याचा, शिक्षणाचा उपयोग करून घेत आत्मसन्मानानं जगताहेत, ते तुझ्या संघर्षाचं फळ आहे ! या देशातलं खरं विद्येचं, ज्ञानाचं प्रतिक तू आहेस. तुझे विचार, तुझा संघर्ष घराघरातल्या मुलामुलींना शिकवायला हवा… सावित्रीआई, तुला लै लै लै प्रेम… आणि एक घट्ट मिठी.”
किरण माने यांची ही पोस्ट कमालीची व्हायरल झाली असून, यावर अनेकांनी कमेंट्स करत सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.