Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग
Milind Gawali : “माझ्या आईच्याच पोटी जन्माला यायचं….” मिलिंद गवळी यांनी व्यक्त केल्या आईबद्दलच्या भावना
आई…आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात या ‘आई’ला सर्वोच्च आणि अतिशय महत्वाचे स्थान असते. जिच्याशिवाय आपण आपणच नसतो अशी ही आई म्हणजे दैवतच जणू. असे म्हणतात की, “मातृ ऋण कधीच फेडता येत नाही”. अगदी खरे आहे, कारण ते फेडण्याइतकी कुवत आजवर तरी कोणाचीच नाही. अशी आई सगळ्यांसाठीच खूपच खास असते. जरी आपल्याला कायम तिच्या सावलीत राहण्याची इच्छा असली तरी ती शक्य नाही. मात्र आपल्या आईच्या आठवणी सतत आपल्या सतत आपल्या मनात एका कोपऱ्यात सुरक्षित असतात. (Marathi Top News)
नुकतेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना एक पोस्ट शेअर करत उजाळा दिला आहे. आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या मिलिंद गवळी यांची फॅन फॉलोविंग कमालीची आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मिलिंद यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या खूपच चर्चेत आली आहे. मिलिंद यांनी भरभरून आईबद्दल लिहिले आहे. हे लिहिताना ते भावुक झाल्याचे देखील आपल्याला जाणवते. मिलिंद यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये काय लिहिले जाणून घेऊया. (Milind Gawali)
“”स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”
हि म्हण अगदी खरी आहे, आज माझ्या आईची सोळावी पुण्यतिथी, गेली १६ वर्ष मी पोरका आहे, सोळा वर्षे ज्यांना ज्यांना आई आहे त्यांचा मला हेवा वाटतो, पण कोणाची आई माझ्या आई इतकी सुंदर कधीच मला वाटली नाही, माझा जर पुनर्जन्म असेल तर मला माझ्या आईच्याच पोटी जन्माला यायचं आहे. (Milind Gawali Post)
माझ्या आईला सात भावंड, तीन भाऊ आणि चार बहिणी, माझ्या आजी आजोबांना आठ मुलं. आणि माझ्या आजीची म्हणजेच लक्ष्मीबाईची माझी आई म्हणजेच सुशीलाच लाडकी होती, हल्ली एक दोन मुलांचं करता करता आया थकून जातात, माझी आजी आठ मुलांचं संगोपन करत होती, आठ मुलांना सांभाळायचं काय साधी गोष्ट आहे का, म्हणून मग माझी आई तिच्या वयाच्या सातव्या वर्षापासून तिच्या आईला स्वयंपाकात आणि घर कामात मदत करू लागली, आणि आईला मदत करता करता ती स्वतः सुगरण कधी झाली हे तिला कळलंच नाही.(Marathi Entertainment News)
======
हे देखील वाचा : Archana Joglekar : शूटिंगदरम्यान झाला बलात्काराचा प्रयत्न, हादरलेल्या अर्चना जोगळेकरांनी थेट इंडस्ट्रीच सोडली
======
माझ्या आईचा पोळ्या करण्याचा speed इतका होता की आठ माणसं एका वेळेला जेवायला बसली की ती त्यांना ताटात गरम गरम पोळ्या वाढत असे, आणि त्या आठही जणांच्या पोळ्या खाऊन होईपर्यंत दुसऱ्या गरम पोळ्या त्यांच्या ताटात असायच्याच आणि प्रत्येकाला सात आठ पोळ्या खाऊ घातल्याशिवाय तिला चैन पडायचं नाही, बर पोळ्या लाटत असताना, कोणाची भाजी संपली का, कोणाला वरण भात चटणी कोशिंबीर पापड हे सुद्धा तीच बघायची, तिच्यासारखं प्रेमाने,आग्रहाने जेवायला वाढणं हे मी आजपर्यंत पाहिलेलं नाहीय. (Marathi Top Stories)
होळीच्या दिवशी जवळजवळ शंभर शंभर पुरणपोळ्या ती सहज करत असे, माणसाच्या हृदयाकडचा रस्ता त्याच्या पोटा मार्गे जातो हे तिला चांगलं ठाऊक होतं, म्हणून आज १६ वर्षानंतर सुद्धा असंख्य लोकांच्या मनात घर करून बसली आहे ती, आपल्या घरी आलेला कोणीही असो, उपाशीपोटी जाता कामा नये, हे तिने आयुष्यभर पाळलं, मग तो व्यक्ती कितीही वाजता येवो, रात्री अपरात्री सुद्धा पाहुण्याला जेऊ घालायची, माझे वडील तर पोलीस खात्यात होते, त्यांच्या कामाच्या वेळा फार विचित्र असायच्या, रात्री दोन अडीच तीन वाजता गरम गरम जेवण त्यांना वाढणं तीनं कधीच सोडलं नाही,
======
हे देखील वाचा : Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली?
======
“नीलांबरी” चित्रपटानंतर माझा दुसरा मराठी चित्रपट “आई” होता, त्यामध्ये माझी जी भूमिका होती ती बायकोचं ऐकून आईला त्रास देणाऱ्या मुलाची होती, पिक्चर 50 आठवडे चालला पण मला तो माझ्या आईने बघू नये असंच वाटायचं, माझी आई गेल्यानंतर लगेचच मला मधुरा जसराज यांचा “आई तुझा आशिर्वाद” चित्रपटात काम मिळालं, त्यात माझं रोल खूप छान होतं, पण तो बघायला माझी आई नव्हती. नियतीचे खेळ आपल्या आकलनाच्या पलीकडचे असतात तेच खरं.”
मिलिंद गवळी यांची ही पोस्ट कमालीची व्हायरल झाली आहे. दरम्यान मिलिंद यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे २००० दशकातले जवळपास सर्वच सिनेमे तुफान गाजले. मिलिंद यांना आई कुठे काय करते या मालिकेने न भूतो न भविष्यती अशी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली.