Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mohan Joshi : मराठीतील मायाळू बाप ते हिंदीतील खलनायक!

 Mohan Joshi : मराठीतील मायाळू बाप ते हिंदीतील खलनायक!
कलाकृती विशेष

Mohan Joshi : मराठीतील मायाळू बाप ते हिंदीतील खलनायक!

by रसिका शिंदे-पॉल 04/09/2025

काही जुने जाणते कलाकार असे आहेत ज्यांच्या अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत… अशाच काही कलाकारांच्या यादीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांचं नाव नक्कीच घ्यायला हवं… रंगभूमी, मालिका, मराठी-हिंदी चित्रपटांतून सकारात्मक आणि खलनायक साकारणाऱ्या मोहन यांचा प्रवास फार खडतर होता… अभिनेता होण्याचं स्वप्नही कधी न पाहणाऱ्या मोहन जोशी यांनी कोणत्याही गॉडफादरशिवाय मराठी आणि हिंदीत आपलं साम्राज्य उभं केलं… आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा प्रवास…(Entertainment News)

मोहन जोशी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दित मराठीत बऱ्यापैकी सोज्वळ आणि मायाळू वडिलांच्या भूमिका साकारल्या.. आणि हिंदीत त्यांच्या वाटेला फार कमी सकारात्मक भूमिका आल्या होत्या… कधीच अभिनेता होण्याचं स्वप्न न पाहणाऱ्या मोहन जोशी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झाले. बंगळूरमध्ये जन्म झालेल्या मोहन यांनी लहानपणीच पुणं गाठलं…

================================

हे देखील वाचा : ऐश्वर्या राय बच्चनने नाकारलेले पाच चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का??

=================================

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. मोहन जोशी आपलं घर चालवण्यासाठी स्वत: ट्रक चालवायचे… त्यांनी बऱ्याच मुलाखतींमध्ये असं म्हटलं होतं की, “नोकरीच्या काळात त्यांनी ट्रक चालवून आपला उदरनिर्वाह सुरू केला. ते कोलकाता, भोपाळ आणि देवासपर्यंत गाड्या चालवायचे. मोहन जोशी यांनी सांगितलेले की, जेव्हा ते ड्रायव्हर होते, तेव्हा त्यांना २४ तासही फार कमी वाटायचे. त्यांनी ९ वर्षे गाडीत माल चढवणे, उतरवणे आणि वाहून नेण्याचे काम केले होते”… मात्र, गाडीचा अपघात झाल्यानंतर मोहन यांनी आपली ट्रान्सपोर्ट कंपनी बंद केली आणि अभिनयाकडे आपली पावलं वळवली… (Mohan Joshi Movies)

मोहन जोशी यांनी पुण्यातून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली… परंतु, त्यांना ‘कुरयत सदा टिंगलम’ या नाटकातून विशेष ओळख मिळाली. या नाटकाचे हजाराहून अधिक प्रयोग झाले. यानंतर मोहन जोशींनी ‘धनंजय’ ही पहिली टीव्ही मालिका केली… आणि त्यानंतर भूकंप नावाच्या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका मिळाली आणि त्यांचा अभिनय प्रवास अविरतपणे सुरु राहिला…

कुठल्याही चित्रपटात जितका नायक महत्वाचा असतो तितकाच खलनायक देखील असतो… दोघांच्या भूमिका किंवा दोन्ही पात्र एकमेकांना पुरक असतात… ८०-९०च्या दशकात मराठी आणि हिंदीत बरेच खलनायक होते… अशातच बॉलिवूडला मोहन जोशींच्या रुपात नवा खलनायक मिळाला… ‘मृत्यूदंड’, ‘गंगाजल’, ‘जमीन’, ‘बागबान’, ‘बिच्छु’, ‘बागी’, ‘आरजू’, ‘वास्तव’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली… तसेच, ‘एक डाव भूताचा’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘बलिदान’, ‘जीवलगा’, ‘आपली माणसं’, ‘सवत माझी लाडकी’, ‘तु तिथे मी’, ‘धर्मवीर’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये कामं केली…

====================================

हे देखील वाचा : विदेशात मराठी चित्रपटाचा शूटिंग फंडा

====================================

या व्यतिरिक्त ‘आसू आणि हसू’, ‘कलम ३०२’, ‘मी रेवती देशपांडे’, ‘सुखांत’, ‘नटसम्राट’, ‘अर्णायक’, ‘श्री तशी सौ’ अशा मराठी नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… मोहन जोशींनी केवळ हिंदीच नव्हे तर मराठी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही कामं केली आहेत… ३०० पेक्षा अधिक कलाकृतींमध्ये काम करणाऱ्या मोहन जोशी यांना ‘कलाकृती मीडिया’तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood News bollywood tadaka Entertainment News entertainment news in marathi mohan joshi mohan joshi as villian mohan joshi hindi movies mohan joshi movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.