Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली पाठराखण!
गेल्या काही दिवसांपासून ‘द बंगाल फाईल्स’ (The Bengal Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी मराठी जेवणाबद्दल केलेलं विधान विशेष चर्चेत होतं… त्यांनी मराठी चित्रपटाला गरीबांचं जेवण असं म्हटल्यामुळे सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांच्याच टीकेचा त्यांना सामना करावा लागला होता… आता विवेक यांच्या या विधानानंतर त्यांच्या मराठमोळ्या पत्नी पल्लवी जोशी यांनी त्यांची पाठराखण केली असून, “तो एक नवरा-बायकोमधील एक साधा, विनोदी संवाद होता” असं म्हटलं आहे…

दरम्यान, पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी नुकतीच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.. पल्लवी म्हणाल्या की, “खरं तर, ते विवेक बोललाच नव्हता, ती टिप्पणी मीच केली होती. काय आहे ना काही लोकांकडे खूप वेळ असतो. त्यांना एखाद्या लहानशा किंवा सामान्य गोष्टीमध्येही विनाकारण दोष काढण्याची हौस असते. तो नवरा-बायकोमधील एक गमतीशीर छोटासा संवाद होता. पण, लोकांना ती गोष्ट फारच गंभीर वाटली”
पुढे पल्लवी म्हणाल्या की, “मला नेहमीच हलकं आणि पौष्टिक खाणं आवडतं. मी फूडी नाहीये. जेवणाची वेळ झाली की जेवण करुन घेते. मी साधं डाळ-भात किंवा डाळ-भाकरी खाते. त्यामुळे माझे मित्र मला म्हणतात की तु काय असं बॅट-बॉल सारखं करतेस. जरा लोणचं, चटणी असं काही खात जा. पण, मी ते खात नाही. कारण एकतर ते आरोग्यदायी नाहीत आणि दुसरं म्हणजे मला इतका वेळच नसतो. मी असं जेवण जेव्हा विवेकसाठी बनवायचे. तेव्हा तो म्हणायचा हे तुमचं गरीबांचं जेवण मला नकोय. कारण त्याला पोळी, चटणी, लोणचं, पापड असं सगळं भरलेलं ताट हवं असतं. तर तेव्हा तो फक्त नवरा-बायकोमध्ये झालेला मजेशीर संवाद होता”. (Entertainment News)

पल्लवी जोशी पुडे असं देखील म्हणाल्या की, “त्यानंतर लोकांनी अर्थाचा अनर्थ काढला. काही लोकांनी तर नोटीसही पाठवली, की तुम्ही मराठी संस्कृतीचा अपमान केला आहे. अरे, त्याची बायकोच पक्की मराठी आहे ना? जर खरंच मराठीचा अपमान झाला असता किंवा काही अपमानास्पद वाटलं असतं, तर मीच आधी रागावले असते आणि त्याला शांत केलं असतं. मग तो असा अपमान कसा करेल?” असे म्हणत पल्लवी जोशी यांनी या वादावर अखेर पूर्णविराम लावला आहे.
================================
हे देखील वाचा : “वरण-भात म्हणजे गरीबांचं जेवण”; Vivek Agnihotriच्या विधानावर मराठी कलाकारांचा संताप
=================================
काय म्हणाले होते विवेक अग्निहोत्री?
‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत पल्लवी जोशींना असं विचारण्यात आलं की लग्नानंतर घरी मराठी पद्धतीचं जेवण बनू लागल्यावर विवेक यांची रिएक्शन काय होती? त्यावर पल्लवी म्हणाल्या की, “विवेकना मराठी जेवण आवडायचं नाही… ते नेहमी असं म्हणायचे की काय हे गरीबांचं जेवण बनवलंय…”. पल्लवींच्या या वाक्याला जोड देत विवेक असं म्हणाले, “मी दिल्लीचा असल्यानं कबाब, मटण, चिकण, असं तेलाचा थर असलेलं जेवणं करायची सवय. आता वरण भात त्यांच्या वरणात मीठ देखील नसते. यांची कढीपण एकदम साधी. कढी म्हटलं की माझ्या डोळ्यावर तेलाचा थर तरंगतोय लाल मिरची असं दिसतं पण यांची कढी पण एकदम साधी. हे फुड कल्चर पाहून खरं तर मला धक्काच बसलेला. हे लोक शेतकऱ्यासारखे गरिब जेवण जेवतात, कोणाशी लग्न केलंय मी, असा विचार केला”. (Vivek Gnihotri News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi