Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

Pran हिंदी चित्रपटांच्या खलनायकी भूमिकांचा ‘प्राण’!
हिंदी सिनेमा अनेक मोठ्या, दिग्गज, प्रतिभावान कलाकारांमुळे जगभर ओळखला जातो. हिंदी चित्रपट म्हटले की लगेच डोळ्यासमोर काही मोजके आणि मोठे चेहरेच येतात. आज हिंदी सिनेमाची ओळख रोमॅंटिक हिरोने, रोमॅंटिक चित्रपटांमुळे होते. मात्र एक काळ असा होता जेव्हा हिंदी चित्रपटांची ओळख त्यात असणाऱ्या खलनायकांमुळे व्हायची. यातही एका अशा खलनायकामुळे ही ओळख होती जो खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटांचा ‘प्राण‘ होता. बरोबर प्राण साहेब हिंदी सिनेमातील असे नाव ज्या नावाशिवाय हिंदी सिनेमे कायम अपूर्ण आहेत. (Pran)
बॉलिवूडचे, हिंदी सिनेमांचे चाहते असणाऱ्या सगळ्यांनाच ‘प्राण’ या नावातली आणि या नावाच्या व्यक्तीची ताकद माहित आहे. अभिनेते प्राण यांनी ७० पेक्षा जास्त वर्ष चित्रपटांमध्ये काम केले. प्राण साहेब यांचे नाव उच्चारताच कानात त्यांच्या दंडार आणि भारदस्त आवाजातील अनेक संवाद ऐकू येऊ लागतात. ज्या काळी चित्रपटाच्या मुख्य नायकाचाच सर्वत्र बोलबाला होता त्या काळात प्राण साहेबांनी आपल्या अभिनयाने मुख्य अभिनेत्यालाच बाजूला सारले होते. त्यांच्या प्रभावी अभिनयाने त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखा पडद्यावर अक्षरशः जिवंत केली. आज याच महान अभिनेत्याची जयंती आहे. (Pran Birth Anniversary)

प्राण साहेबांनी ७ दशकं प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली. आज १२ फेब्रुवारी रोजी प्राण साहेबांची १०५ वी जयंती साजरी होत आहे. १९२० साली आजच्या दिवशी दिल्लीमध्ये लाला केवल कृष्णा सिकंद या सरकारी कंत्राटदाराच्या घरी प्राण साहेबांचा जन्म झाला. फाळणीपूर्वी त्यांनी छायाचित्रकार म्हणून करिअरला सुरुवात केली. ते दिल्लीतील ‘ए दास अँड कंपनी’ या कंपनीत शिकाऊ म्हणून काम करत असे. या कामाच्या संदर्भात त्यांना लाहोरला जावे लागले. इथेच त्यांच्या सिनेप्रवासाची सुरुवात झाली. (Ankahi Baatein)
लाहोरमध्ये प्राण साहेबांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. मात्र फाळणीनंतर ते भारतात आले. त्यांना अभिनयात रस असल्याने त्यांनी चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी मुंबई गाठली. येथे आल्यानंतर ते हॉटेल ताजमध्ये त्यांच्या बायकोसह राहत होते. १९४५ मधेच प्राण यांचे लग्न प्राण यांचे झाले होते. पुढे ते पत्नी शुक्लासह मुंबईत आले. मात्र इथे त्यांना काम मिळत नव्हते अनेक महिने ते काम मिळवण्यासाठी धडपडत होते. अशातच हॉटेलचे बिल इतके झाले की ते फेडण्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीचे दागिने विकावे लागले. (Entertainment mix masala)

पुढे उदरनिर्वाहासाठी त्यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अशातच त्यांना १९४८ साली प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो आणि अभिनेता श्याम यांच्या मदतीने, बॉम्बे टॉकीजच्या ‘जिद्दी’ चित्रपटात भूमिका मिळाली. या नंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये भूमिका करण्यास सुरुवात केली. १९५० सालापर्यंत प्राण फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय खलनायक म्हणून नावारूपास आले होते. एक काळ इंडस्ट्रीमध्ये असा आला होता जेव्हा प्राण यांना मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन मिळू लागले. प्राण यांनी प्रत्येक दशकातील सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले. (Bollywood Masala)
१९४० ते १९४७ पर्यंत प्राण पडद्यावर एक हिरो म्हणून प्रसिद्ध होते. त्यानंतर त्यांनी १९४८ ते १९९१ पर्यंत त्यांनी संस्मरणीय नकारात्मक भूमिका साकारल्या. पुढे त्यांनी सहाय्यक भूमिका साकारायला सुरुवात केली. प्राण यांचा अभिनय इतका खरा वाटायचा की खऱ्या आयुष्यात देखील लोकं त्यानं वाईटच समजायचे. महिला तर त्यांच्यापासून नेहमीच अंतर ठेऊन असायच्या. (Celebrity Interviews)

एका मुलाखतीमध्ये खुद्द प्राण साहेबांनीच सांगितले होते की, चित्रपटांमध्ये ते साकारत असलेल्या खलनायकाच्या भूमिकांमुळे लोकं त्यांना ते जेव्हा रस्त्यावर चालायचे तेव्हा शिवीगाळ करायचे. त्यांना पाहून बदमाश, लफंगा आणि गुंडा म्हणायचे. एवढेच नाही तर लोकांनी त्यांच्या मुलांचे नाव प्राण ठेवणेही बंद केले होते. सामान्य लोकं काय इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या नवीन अभिनेत्री देखील त्यांना घाबरून असायच्या. प्राण यांच्यासोबत प्रवास करण्यास राहण्यास अनेक अभिनेत्रींना भीती वाटायची. मात्र प्राण त्यांच्या खऱ्या आयुष्यात अतिशय वेगळे आणि साधे, प्रेमळ आणि नम्र होते. (Bollywood Tadka)
============
हे देखील वाचा : Kishore Kumar : ‘आ चल के तुझे मैं लेके चलू…’ गाण्याचा किस्सा
============
प्राण यांनी ७ दशके चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी जवळपास ३६२ चित्रपट केले. २००७ मध्ये आलेला ‘दोष’ हा त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट होता. प्राण यांना त्यांच्या विलक्षण अशा सिनेकारकिर्दीसाठी अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण आणि फिल्मफेयर पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले होते. या दिग्गज अभिनेत्याचे प्रदीर्घ आजारामुळे १२ जुलै २०१३ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.