
Pushkar jog : “मराठी चित्रपट परदेशी शुट करणं कसं परवडतं?”, जोग म्हणतो…
मराठी चित्रपटसृष्टीत टेक्नोलॉजीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केला. अगदी परदेशात जाऊन त्यांच्या कला शिकून ‘झपाटलेला’ किंवा ‘थरथराट’ या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रयोग केले आणि प्रेक्षकांना ते आवडलेही. गेल्या काही काळात अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर जोग देखील वेगवेगळे प्रयोग आपल्या मराठी चित्रपटांमध्ये करताना दिसत आहे. AI Technology वर भाष्य करणारा पहिला चित्रपट त्याने मराठीत आणला इतकंच नाही तर परदेशात आजपर्यंत हिंदी चित्रपटांचंही शुट झालं नसेल अशा लोकशन्सवर त्याने मराठी चित्रपटांचं शुट केलं आहे. पण आर्थिकदृष्ट्या त्याला हे कसं जमतं यावर पुष्करनेच उत्तर दिलं आहे. (Pushkar Jog)
आत्तापर्यंत पुष्करने ‘जबरदस्त’, ‘वेल डन बेबी’, ‘अदृश्य’, ‘इट्स टू मच’, ‘ऐसी भी क्या जल्दी है’, ‘डोन्ट वरी बी हॅपी’, ‘बापमाणूस’, ‘मुसाफिरा’, ‘सून लाडकी सासरची’, ‘द एआय धर्मा स्टोरी’ या चित्रपटांमध्ये कामं केली. लवकरच तो ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटात वेगळीच भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसताना त्याला परदेशांत चित्रपट शूट करणं कसं परवडतं, यावर महत्वपूर्ण विधान केलं आहे. (Entertainment news)

पुष्कर जोगने‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “निर्माता म्हणून बाहेर जाऊन शूट करणं आव्हानात्मक आहे. अॅमस्टरडॅम, पॅरिससारख्या ठिकाणी शूट झालेली ही पहिली मराठी फिल्म आहे. आयफेल टॉवर पडद्यावर दिसणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. मला वाटतं की, निर्मात्यानं स्मार्ट प्रोड्युसर असणं गरजेचं आहे. नुसते पैसे लावले म्हणून तुम्ही निर्माते होत नाही. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक वेळेसाठी असलेले निर्माते खूप आहेत, ते पैसे लावतात आणि त्यांना मेकर्स फसवतात. मी कोणाचं नाव घेत नाही. पण, त्या-त्या बजेटमध्ये चित्रपट बनत नाहीत. पैशांचा नीट वापर केला जात नाही. समजा, तीन कोटींचा चित्रपट असेल, तर तो बनता-बनता प्रदर्शित होईपर्यंत पाच-साडेपाच कोटी खर्च होतात. त्यामुळे प्रोड्युसर खचतो आणि म्हणतो मला हे क्षेत्र नको. त्यात कलाकारांचे नखरे असतात. थिएटर्स मिळत नाहीत. या सगळ्याचा त्रास निर्मात्याला होतो.” (Marathi films)
===============================
पुढे तो म्हणाला की, “मला कसं जमतं, तर मी खूपच प्रामाणिकपणे माझं काम करतो, माझ्या निर्मात्याचा एक रुपयाही वाचवला, तर मला खूप आनंद होतो. माझं बजेट परवडणारं असतं. जिथे मला माहीत आहे की, माझी सॅटेलाईट किंमत काय आहे, त्या बजेटमध्ये मी चित्रपट बनवतो.” (Marathi films budget)
दरम्यान, ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटात हेमल इंगळे, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे व किशोरी अंबिये हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकात आहेत. (Hardik shubheccha Marathi movie)