दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अभिनेता R.Madhavan ने मुंबईत विकत घेतला महागडा फ्लॅट; किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !
अभिनेता आर माधवन आपल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखला जातो. लोकांना त्याच्या चित्रपटांची कथा खूप आवडते. काही काळापूर्वी या अभिनेत्याचा शैतान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात तो नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळाला आणि त्याच्या या भूमिकेला खुप पसंत ही केल गेलं. नुकताच हा अभिनेता त्याच्या फैट टू फिट प्रवासामुळेही चर्चेत आला आहे. याशिवाय आता अभिनेत्याबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे ज्यामुळे पुन्हा एकदा अभिनेता आर माधवन चर्चेत आला आहे. तर अभिनेता आर माधवन याने मुंबईत बीकेसीमध्ये तब्बल सतरा कोटी रुपयांचे अपार्टमेंट खरेदी केले आहे. जे खूप भव्य असल्याच बोलल जात आहे. तसेच हा फ्लॅट सुमारे 4,182 स्क्वेअर फुटांमध्ये पसरलेला असल्याची माहिती ही समोर आली आहे.(R Madhavan New Mumbai House)
आर माधवनने नुकतीच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नवीन प्रॉपर्टी खरेदी करून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. कागदपत्रांनुसार, माधवनने ही मालमत्ता तब्बल 17.5 कोटींना खरेदी केली होती. आर माधवन ची नवीन मालमत्ता सुमारे 389 चौरस मीटरमध्ये पसरली आहे आणि त्यात पार्किंगची दोन जागा आहेत. आणि याशिवाय बऱ्याच गोष्टी आहेत. ही प्रॉपर्टी सिग्निया पर्ल या 4 आणि 5 बीएचके अपार्टमेंट असलेल्या आलिशान इमारतीत असून यामध्ये ‘व्हेनिस सुईट्स‘चाही समावेश आहे, ज्याला सध्या मोठी मागणी आहे. उत्तम जीवनशैलीची पूर्तता करणाऱ्या प्रीमियम वैशिष्ट्यांसह हा प्रकल्प येतो. लोकांची राहण्याची जागा, अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि उत्तम वातावरण मिळावे यासाठी याची रचना करण्यात आली आहे.
स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी १ कोटी ५ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरून ही मालमत्ता खरेदी करण्यात आली होती. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात आर माधवनचा नवा फ्लॅट आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) हे मुंबईतील सर्वात पॉश ठिकाणांपैकी एक आहे, जे उच्च दर्जाचे निवासी राहण्याचे क्षेत्र आहे.त्यामुळे तिथे बरेच कलाकार राहतात. आलिशान राहण्याच्या पर्यायाबरोबरच, हे एक अस एक ठिकाण आहे जिथे प्रॉपर्टीच्या किंमतही खूप जास्त आहेत.(R Madhvan New Mumbai House)
=============================
हे देखील वाचा: तो येतोय…आता कल्ला तर होणारच! ‘बिग बॉस मराठी’चा 5 वा सीझन 28 जुलैपासून सुरु होणार
=============================
आर. माधवन बद्दल अधिक जाणून घ्यायचे झाले तर त्याने ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट‘ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त ही आहे. नयनतारा आणि सिद्धार्थ अभिनीत एस. शशिकांत यांच्या ‘टेस्ट‘ या पहिल्या चित्रपटाची तो तयारी ही करत आहे.