Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

“मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलंच पाहिजे!”; Rohit Sharmaने साधला हास्यजत्रेच्या

सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी

OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या

Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Actor Sayaji Shinde बावीस वर्षांनी पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी !

 Actor Sayaji Shinde बावीस वर्षांनी पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी !
Actor Sayaji Shinde
नाट्यकला

Actor Sayaji Shinde बावीस वर्षांनी पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी !

by Team KalakrutiMedia 26/01/2025

Actor Sayaji Shinde: मनोरंजनविश्वात आपला ठसा उमटवत काहीतरी वेगळं देऊ पाहणारे कलाकार एकत्र आले की,काहीतरी खास पाहायला मिळणार याची खात्री असते. रंगभूमीवर वैविध्यपूर्ण नाटकांची रेलचेल नव्या वर्षात बघायला मिळणार असताना एका सशक्त नाटकाच्या निमित्तानं मराठी रंगभूमीवर दोन अवलिया रंगकर्मी एकत्र आले आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या सकस कलाकृतींनी आणि अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी, साऊथ सिनेसृष्टीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या अंगभूत असलेल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करत डबिंग आर्टिस्ट,अभिनय, दिग्दर्शन ते नाट्यनिर्माता अशी चौफेर मुशाफिरी करत अजित भुरे यांनी आपला वेगळेपणा दाखवून दिला आहे. या दोन कलासंपन्न कलाकारांना या नाटकाने एकत्र आणले आहे.(Actor Sayaji Shinde)

Actor Sayaji Shinde
Actor Sayaji Shinde

सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर येतायेत. या नव्या नाटकासाठी या दोन दिग्गज मान्यवरांना एकत्र आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. या निर्मिती संस्थेचं हे तिसरं नाट्यपुष्प आहे. या दोन अनुभवी कलाकारांच्या एकत्र येण्याने हे नवं नाटक कोणतं ? याची उत्सुकता ही शिगेला पोहचली आहे. या दोन अवलिया कलाकारां व्यतिरिक्त या नाटकात कोण आहे ? या नाटकाचं नाव काय ? या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहे. लवकरचं या नाटकाचा शुभारंभ केला जाणार आहे. या निमित्ताने अभिनेते सयाजी शिंदे २२ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत तर नाट्यनिर्माता अजित भुरे ६ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे वळले आहेत. कलासंपन्न अशा दोन कलाकारांची नाट्यकृती प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल.

==================================

हे देखील वाचा: आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’…

==================================

अभिनेते सयाजी शिंदे सांगतात, ‘नाटकात काम करण्याच्या हेतूने मी मुंबईत आलो होतो पुढे चित्रपटांमध्ये व्यस्त झालो. आता पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करता येणार याचा आनंद आहेच. दर ५ वर्षांनी माणूस आणि गोष्टी बदलतात असे म्हणतात. या बदलाला या नव्या नाट्यकृतींच्या माध्यमातून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.‘जुनं ते सोनं’ असं म्हणतात, याच जुन्या विषयाचा नव्या अंगाने आढाव घेणारं काहीतरी करण्याची इच्छा असताना या नाट्यकृतीची विचारणा झाली. अजित भुरे सारखा कलासक्त माणूस ज्याच्यासोबत मी प्रायोगिक काम केलं. आता या नाटकाच्या निमित्ताने व्यावसायिक काम करताना त्याच्याकडून नवं काहीतरी शिकायला मिळणार. कलाकारापेक्षा माणूस महत्त्वाचा असं म्हणणाऱ्या अजित आणि मी मनोरंजनाचा समृद्ध असा काळ पहिला आहे. त्यामुळे याच समृद्धतेचा अनुभव त्याच्या सोबतीने नाट्यरसिकांना पुन्हा देता येणार हे मला खूप महत्त्वाचं वाटतं’.

Actor Sayaji Shinde
Actor Sayaji Shinde

सयाजी शिंदेंना झुलवा नाटकात पाहाणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता.अशा जबरदस्त कलाकारासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी लवकरच प्राप्त होते आहे. मला खात्री आहे की ह्यामुळे मी सुद्धा एक कलाकार म्हणून समृद्ध होईन. सयाजी शिंदे एका महत्वाच्या नाटकात भूमिका करत आहेत. मराठी नाट्यसृष्टीत माइलस्टोन ठरलेली ही कलाकृती आहे.आजच्या काळात ह्या नाटकाला भिडणं आव्हानात्मक वाटलं आणि सुमुख चित्र ह्या संस्थेच्या पुढाकाराने ते जुळून आलं. त्या विषयी मला आनंद असल्याचे अजित भुरे यांनी बोलताना सांगितले.(Actor Sayaji Shinde)

=================================

हे देखील वाचा: Almost Comedy Marathi Stand Up Show: हास्याचा धमाका घेऊन येत आहे ‘ऑलमोस्ट कॉमेडी’!

=================================

आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज विविध क्षेत्रात यशस्वी पद्धतीने कार्यरत असून आता ही कंपनी ‘सुमुख चित्र’ च्या माध्यमातून नाट्यक्षेत्रात काम करते आहे. सुमुख चित्र चे कार्यकारी निर्माते निखिल जाधव सांगतात की,अभिरुचीसंपन्न कलाकृती नाट्य रसिकांसाठी आणण्याचा आमचा मानस असून अनुभवी आणि दिग्ग्ज कलावंतांची ही नवी नाट्यकृती नाट्यरसिकांसाठी दमदार मेजवानी असणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor Sayaji Shinde Entertainment Marathi Actor marathi drama sayaji shinde marathi drama
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.