Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Siddharth Jadhav : ४१ कोटींचा खरंच मालक आहे का सिद्ध्या?
लालबाग-परळमधील चाळ संस्कृतीत लहानाचा मोठा झालेला अभिनेता सिद्धार्थ जाधव याने खरंच केवळ आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीही काबीज केली. २००४ साली अगं बाई अरेच्चा या चित्रपटातून सिद्धार्थचा सुरु झालेला प्रवास अगदी रोहित शेट्टीच्या सिंबापर्यंत आला आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ वर्ष नाट्य, चित्रपटसृष्टीत सातत्याने काम करणाऱ्या सिद्धार्थची संपत्ती किती कोटींच्या घरात नक्कीच असेल. याच बाबतीत त्याने एका मुलाखतीत ४१ कोटींची संपत्ती असल्याचं म्हटलं होतं. नेमकं काय म्हणाला सिद्धार्थ जाणून घेऊयात..(Siddharth Jadhav)
तर, अमोल परचुरेंच्या ‘कॅचअप’ या पॉडकास्टमध्ये सिद्धार्थला तु ४१ कोटींचा मालक आहे असं समजलं आहे. त्यावर सिद्धार्थ हसून म्हणाला, “ मी ४१ कोटींच्या कोट्या केल्या असतील. पण खरंच जे काही कमवलंय या २५ वर्षात किंवा इतक्या वर्षात ते ४१ कोटींच्या पलीकडचं आहे. आकड्यांमध्ये ती संपत्ती मलाही माहित नाही. पण, कुठेतरी स्थिर झालो आहे. जेव्हा मुंबईत आलो होतो तेव्हा पप्पांच्या मित्राच्या भाड्याच्या घरात राहत होतो. शिवडीला झोपडपट्टीत राहत होतो. तेव्हा स्वप्न होतं की आई-वडिलांसाठी घर घ्यायचं. ते २६ वर्षांनी पूर्ण केलं. (Marathi celebrities)

पुढे सिद्धार्थ म्हणाला, “आई-वडिलांसाठी छानसं घर घेऊ शकलो. लालबाग शिवडीच्या परिसरात मोठा झालो. त्या परिसरात घर घ्यायचं. माझं स्वप्न होतं की दादरला घर घ्यायचं. बेसिक गोष्टी ज्या जगण्यासाठी लागतात, त्या घेऊन स्वत:ला सेटल करू शकलो. त्यामुळे मला वाटतं की ह सारं काही ४१ कोटींपेक्षा जास्त आहे. माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद आहेच. ती मला १०० कोटींचा मालक असल्याची भावना आहे. माझ्या आई वडिलांना हक्काच्या घरात सेट करू शकलो. कारण-झोपडपट्टीतून निघाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भाड्याच्या घरात ठेवलं तेव्हा भाड्याच्या घरावर पप्पांची नेमप्लेट लावली होती. तेव्हा मला माहित नव्हतं की भाड्याच्या घरावर भाडेकरूची नेमप्लेट लागत नाही. तेव्हा ते मालक म्हणाले होते, तसं होऊ शकत नाही. आता मी आई-वडिलांची नेमप्लेट लावली आहे. ही माझ्यासाठी मिळकत आहे.” आणि शेवटी ४१ कोटींच्या संपत्तीवर तो हसत म्हणाला,”ही चांगली गोष्ट आहे. ही बातमी खोटी आहे की कोटी आहे मला माहित नाही. पण चांगली आहे, मला बरं वाटलं”.(Untold stories)
============
हे देखील वाचा : Bharat Jadhav : मराठी मनोरंजनसृष्टीतला ‘श्रीमंत’ कलाकार!
============
सिद्धार्थ लवकरच बऱ्याच काळानंतर भरत जाधव यांच्यासोबत ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भरत जाधव (Bharat Jadhav) आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) ही गाजलेली जोडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्यामुळे प्रेक्षकांना विशेष उत्सुकता आहे. दरम्यान, सिद्धार्थने आत्तापर्यंत ‘जत्रा’, ‘साडे माडे तीन’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘इरादा पक्का’, ‘खो खो’, ‘हुप्पा हुय्या’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘शासन’, ‘रझाकार’, ‘शिकारी’, ‘सर्कस’, ‘नवरा माझा नवसाचा २’, अशा अनेक चित्रपटात विविधांगी भूमिकेत दिसला आहे.

विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा सिद्धार्थ जाधव पैश्यांच्या बाबतीत कोटींचा मालक आहे की नाही माहित नाही पण करोडो प्रेक्षकांच्या आशिर्वादाची आणि प्रतिसादाची संपत्ती त्याच्याकडे नक्कीच आहे यात तिळमात्र शंका नाही.(entertainment masala)