Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

‘पाठक बाई’ देणार गुड न्यूज? Akshaya Deodhar च्या व्हिडिओवरुन प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण!
मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय जोडी म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणा दा आणि पाठक बाई. या मालिकेने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आणि मालिकेसोबतच सेटवरही एक सुंदर प्रेमकहाणी फुलली. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी डिसेंबर 2022 मध्ये विवाहबंधनात अडकून आपल्या प्रेमाची अधिकृत मुहर लावली. आता त्यांच्या लग्नाला जवळपास तीन वर्षं होत आली असताना, अक्षया देवधरच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांनी जोर चढलेला दिसतोय. (Akshaya Deodhar Pregnant)

अलीकडेच tellygappa_official
या इंस्टाग्राम पेजवरून ‘लक्ष्मी विलास’ मालिकेतील एक BTS व्हिडीओ शेअर करण्यात आला होतो . या व्हिडीओत अक्षया म्हणजेच ‘भावना‘ आपल्या को-स्टारसोबत लग्नाचे सीन करताना दिसतेय. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ती एका सशासोबत खेळताना दिसते आणि याच व्हिडीओमध्ये तिच्या पोटाचा आकार पाहून अनेक युजर्सनी अंदाज वर्तवला की, “अक्षया प्रेग्नंट आहे का?”

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी अक्षयाच्या लूकवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी स्पष्टपणे लिहिलं की, “भावना आता गरोदर आहे, त्यामुळे मालिकेतून बाहेर पडणार.” तर काहींनी विचारलं आहे की, “ही ऑन-स्क्रीन गोष्ट आहे का, की रिअल लाइफमध्येही गुड न्यूज आहे?” या चर्चांमध्ये सध्या सोशल मीडियावर खूप गोंधळ पहायला मिळत आहे. मात्र, अक्षया देवधर किंवा हार्दिक जोशी यांच्याकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे लवकरच समजेल.(Akshaya Deodhar Pregnant)
==============================
==============================
अक्षयच्या कमाबद्दल बोलायच झाल तर, ‘तुझ्यात जीव रंगला’ नंतर काही काळ टेलिव्हिजनपासून दूर असलेल्या अक्षयाने ‘लक्ष्मी विलास’ मालिकेतून आपला भव्य कमबॅक केला आहे. तिनं साकारलेली ‘भावना’ ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, आणि आता या नव्या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.