
नयिकेची होणार खलनायिका! अभिनेत्री Akshaya Hindalkar ची होणार अबोली मालिकेत एण्ट्री…
Aboli Serial: स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत लवकरच सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकरची (Akshaya Hindalkar) एण्ट्री होणार आहे. याआधी अक्षयाने स्टार प्रवाहच्या साता जल्माच्या गाठी आणि तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. जवळपास ४ वर्षांनंतर अबोली मालिकेतून ती स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे. सुप्रिया नागरगोजे असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ती पहिल्यांदा खलनायिका साकारणार आहे.(Aboli Marathi Serial)

अभिनेत्री अक्षया सुरेखा हिंडळकर हिने आपल्या करिअरची सुरुवात स्टार प्रवाह या वाहिनीवरील साता जन्माच्या गाठी (Saata Jalmachya gaathi) या मालिकेमधून केली. या मालिकेनंतर अक्षया सुरेखा हिंडळकरने कलर्स मराठी वरील सरस्वती (Sarswati) या मालिकेमध्ये मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर अक्षया सुरेखा हिंडळकरहीने स्टार प्रवाह या वाहिनीवर तुझ्या इश्काचा नाद खुळा (Tuzya Ishqacha Naadkhula) या मालिकेमध्ये स्वाती नावाची भूमिका ही साकारली आहे.
==================================
==================================
अबोली मालिकेत सुप्रिया नागरगोजे ही आपल्या जुळ्या बहिणीच्या म्हणजेच पौर्णिमाच्या खुनाचा प्रतीशोध घेण्यासाठी प्रयत्न करते आहे. तिला पूर्ण खात्री आहे की, पौर्णिमाचा घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात झालेला मृत्यू हा अपघाती नव्हे तर घातपात होता आणि हा सुनियोजित खून पोर्णिमाच्या सासू-सासऱ्यांनी केला आहे. परंतु हे सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा नाहीये अशावेळी अबोली आपल्याला आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देईल ह्या अपेक्षेने सुप्रिया अबोलीकडे येते.(Aboli Marathi Serial)

परंतु फटकळ आणि वाचाळ स्वभाव असलेल्या सुप्रियाच्या बोलण्यावर अबोलीचा विश्वासच बसत नाही. सुप्रिया आपल्या बहिणीला कसा न्याय मिळवून देणार? अबोली सुप्रियाला साथ देणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. आणि अबोली मालिका आपल्याला रोज रात्री ११ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.