Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील टॅक्नॉलॉजीचा बादशाह!

Anushka Sharma ५०० कोटी क्लबमध्ये चित्रपट देऊनही आता बॉलिवूडपासून आहे

Prasad Oak यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५’ घोषीत!

Ahilyadevi Holkar Marathi Biopic: रुपेरी पडद्यावर येणार अहिल्यादेवींचा जीवनप्रवास; ‘हिंदू हृदय

‘All Is Well’ सिनेमात दिसणार धमाल त्रिकुट; अमर, अकबर आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Actress Isha Keskar: ईशा केसकरचं ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन!

 Actress Isha Keskar: ईशा केसकरचं ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन!
kalakruti-actress-isha-keskar-isha-keskar-makes-a-strong-comeback-on-the-small-screen-with-lakshmichya-paulani-marathi-info/
टीव्ही वाले

Actress Isha Keskar: ईशा केसकरचं ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन!

by Team KalakrutiMedia 15/10/2023

टीआरपीचे नव ववे विक्रम रचत सातत्याने तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन नवनव्या मालिका सादर केल्या आहेत. मनोरंजनाच्या या प्रवाहात लवकरच एक नवी मालिका सामील होणार आहे. मालिकेचं नाव आहे लक्ष्मीच्या पाऊलांनी. सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा केसकर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. कला खरे असं तिच्या भूमिकेचं नाव असून एका वेगळ्या रुपात ईशा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.’जय मल्हार’ या मालिकेतुन ईशा ने प्रेक्षकांची मन जिंकली होती. आता एवढ्या वर्षानंतर ईशा पुन्हा मालिकेतुन येतेय या बातमीमुळे प्रेक्षक तिला मालिकेत पुन्हा पाहण्याची वाट बघत आहेत. (Actress Isha Keskar)

स्टार प्रवाहसोबतची पहिली मालिका साकारण्यासाठी ईशा प्रचंड उत्सुक आहे. या मालिकेविषयी सांगताना ईशा म्हणाली, ‘सध्या सगळीकडेच नवरात्रौत्सवाची धामधूम सुरु आहे. अश्या या मंगलमय वातावरणात लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेचा प्रोमो येतोय ही खूप भारावून टाकणारी गोष्ट आहे. या मालिकेत मी कला खरे ही भूमिका साकारत आहे. नावाप्रमाणेच कला एक उत्तम कलाकार आहे. तिला हातकाम, रंगकला आणि चित्रकलेची आवड आहे. ती देवीची मूर्ती आणि दागिने घडवते. अंबाबाईच्या देवळाबाहेर कलाचं दागिन्यांचं दुकान आहे. ती स्वतःच्या हाताने सर्व पारंपारिक दागिने अगदी मनापासून बनवते. संपूर्ण कोल्हापूर शहरात तिने बनवलेले दागिने प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या कलाला गरीब-श्रीमंत असा भेद केलेला आवडत नाही. हे पात्र प्रत्येकाला आपलसं वाटेल असं आहे.

आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे. हेच प्रेम कला आणि आमच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय. किशोरी अंबिये माझ्या आईची भूमिका साकारत आहेत. किशोरी ताईंसोबत याआधीही काम केलं आहे. त्यामुळे सीन्स खूप छान होत आहेत. कोल्हापूरातल्या अनेक प्रसिद्ध ठिकाणी आम्ही सध्या शूट करत आहोत. मालिका सुरु होण्यापूर्वीच कोल्हापुरकरांचं भरभरुन प्रेम मिळत आहे अश्या शब्दात ईशाने आपली भावना व्यक्त केली.(Actress Isha Keskar)

==================

हे देखील वाचा: चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय, ‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’!

==================

नवी मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी‘ २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० वाजता आणि सुख म्हणजे नक्की काय असतं नव्या वेळेत रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येतील.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actress Isha Keskar Entertainment isha keskar hot laxmichya paulani serial Marathi Serial Star Pravah
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.