कानाच्या दुखापतीवर मात करुन अभिनेत्री जुई गडकरीने केली ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या शूटिंगला जोमाने सुरुवात
इच्छा तिथे मार्ग… ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. आता या म्हणीचा अनुभव नुकताच घेतलाय ठरलं तर मग मालिकेतील सर्वांची लाडकी सायली अर्थातच अभिनेत्री जुई गडकरीने. जुईची ठरलं तर मग मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. जुईच्या सहजसुंदर अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. सायली या व्यक्तिरेखेवर जुईचंही मनापासून प्रेम आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच जुईने शूटिंगमधून काही दिवसांचा ब्रेक घेतला होतो आणि याच कारण होतं तिचा झालेला एक छोटा अपघात.(Jui Gadkari Marathi Serial)
नुकत्याच झालेल्या एका छोट्या अपघातामध्ये जुई गडकरीच्या कानाला दुखापत झाली होती. यावर औषधोपचार घेऊन बरं वाटेल असं सुरुवातीला जुईला वाटलं होत मात्र हे दुखणं दिवसागणिक वाढत गेलं. आणि डॉक्टरांकडे पुन्हा तपासणी केल्यानंतर तिला अखेर शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवण्यात आला होतो. त्यामुळे जुईसाठी हा काळ अत्यंत कठीण आणि कसोटीचा होता. ठरलं तर मग या मालिकेत सध्या प्रतिमाच्या एण्ट्रीनंतर सायली आणि प्रतिमाचे अनेक भावनिक प्रसंग सुरु आहेत. जुईने एका इमोशनल सीनसाठी अंगाई देखिल गायली आहे.
पण कानाच्या पडद्याला इजा झाल्यामुळे तिला आवाजातले चढ-उतार कळत नव्हते. मात्र मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले आणि संपूर्ण टीमने जुईला धीर दिला आणि जुईने खूप उत्तमरित्या हे सीन साकारले गेले. जुईला तिच्या कानाच्या शस्त्रक्रियेसाठी आठवडाभराची रजा गरजेची होती. मात्र जुईने शूटिंग संपवून मगच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जुईच्या सीन्सना प्राधान्य देऊन शूटिंगची आखणी ही करण्यात आली.(Jui Gadkari Marathi Serial)
============================
हे देखील वाचा: ‘फुलवंती’ चित्रपटातील भव्यदिव्य टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला…
============================
यासाठी जुईने स्टार प्रवाह वाहिनी, सहकलाकार आणि ठरलं तर मग या मालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. बाप्पाचा आशीर्वाद आणि संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळेच मी हे करु शकले असं ही जुई गडकरी म्हणाली. ठरलं तर मग या मालिकेवर आणि सायलीवर असंच प्रेम करत रहा अशी विनंती ही तिने प्रेक्षकांना केली आहे.