Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raid 2 : बॉक्स ऑफिसवर ‘रेड २’ चित्रपटाने मारली बाजी!

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आणखी एक कियारापट

 आणखी एक कियारापट
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

आणखी एक कियारापट

by सई बने 24/11/2020

कोरोनाच्या भीतीचा विळखा चित्रपट सृष्टीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. आता काही प्रमाणात चित्रपटगृह खुली झाली असली तरी तिथे जाऊन नवीन चित्रपट पहाण्यापेक्षा प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला अधिक पसंती दिली आहे. मात्र त्यातही काही निर्मात्यांनी मोठ्या पडद्यावरच चित्रपट प्रदर्शित करण्याला प्राधान्य दिलं आहे.   त्यात सूरज पे मंगल भारी हा चित्रपट पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाला मिळालेले संमिश्र यश पहाता 11 डिसेंबरला आणखी एक चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे, तो म्हणजे इंदू की जवानी. सध्याच्या आघाडीच्या नायिकांमध्ये समावेश असलेल्या कियारा आडवाणीचा हा लक्ष्मी नंतरचा अजून एक महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. कियाराचा सध्या फॅनफऑलोअर मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मिडीयावरही ती चांगलीच ॲक्टीव्ह आहे. शिवाय इंदू की जवानी हा सबकुछ कियारा असाच चित्रपट आहे. त्यामुळे कियाराच्या लोकप्रियतेचा फायदा चित्रपटाला होईल अशी आशा निर्मात्यांना आहे. 

बंगाली लेखक आणि चित्रपट निर्माते अबीर सेनगुप्ता दिग्दर्शित इंदू की जवानी हा बॉलिवूडमधला पहिलाच चित्रपट. पण कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक महिने चित्रपट लटकला होता. अलिकडेच चित्रपटाचे अगदी मोजके राहिलेले चित्रिकरण पूर्ण करुन तो थेट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचे उद्दीष्ट निर्मात्यांनी ठेवलं आहे.

निखिल आडवाणी, निरंजन अयंगर, आणि रायन स्‍टीफेन चित्रपटाचे निर्माते आहेत. कियाराची यात प्रमुख भूमिका आहे. आदित्य सैल हा तिचा सहकलाकार म्हणून दिसणार आहे. सध्या कियारानं आपल्या सोशल अकाऊंटवरुन इंदू की जवानीचा ट्रेलर रिलीज केलाय. आणि त्याला तिच्या चाहत्यांचा चांगलांच प्रतिसाद मिळतोय. चित्रपट गाजियाबादमध्ये रहाणा-या इंदू गुप्ता या तरुणीभोवती फिरतो.  सुंदर असलेली इंदू आपल्यासाठी योग्य जोडीदार शोधत असते. मात्र तिला अपयश मिळते. अशावेळी तिची मैत्रिण तिला एका डेटींग ॲपची माहिती सांगते. या ॲपमधून इंदू आपल्यासाठी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करते. ॲपच्या माध्यमातून तिच्यापर्यंत एक पाकिस्तानी तरुण पोहचतो. त्याचवेळी शहरात अतिरेकी आल्याची बातमीही येते. या सर्वांत जो घोळ होतो तो पडद्यावर पहाण्यासारखा आहे.  चित्रपटात मल्लिका दुआ, मनिष चौधरी,राजेश जैस, अमित बिमरोट यांच्याही भूमिका आहेत. 

हे हि वाचा : केवळ त्याच्या ४५ मिनिटांचा अभिनय आणि डायलॉगसाठी लोकं दामिनी हा सिनेमा आजही पूर्ण बघतात.

इंदू की जवानीमधील हसीना पागल दिवानी या गाण्यानं आधीच टॉपटेन गाण्यांच्या यादीत आपला नंबर लावला आहे. त्यात कियारा अतिशय सुंदर दिसतेय. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तिचा अभिनय कसा आहे, हे पहाता येईल. अक्षय कुमारच्या लक्ष्मी नंतर कियारा आडवाणीचं नाव अधिक चर्चेत आलं आहे.  कियाराकडे सध्या मोठ्या बॅनरचे चांगले चित्रपट आहेत. जुग जुग जियो चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. तर शेरशहा आणि भूल भुलैया 2 या तिच्या चित्रपटांचे चित्रिकरण सुरु आहे.

सौजन्य : युट्युब

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood movie Bollywood Topics bollywood update Celebrity Celebrity News Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.