
“तुम्ही इतके असंवेदनशील कसं असू शकता?”; गाडीला धडक लागल्यानंतर Kishori Shahane यांनी व्यक्त केला संताप
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सोशल मिडियावर विशेष सक्रीय असणाऱ्या किशोरी यांनी नुकताच त्यांच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रकार शेअर केला आहे. शुटींगसाठी प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. नेमकं किशोरी यांच्यासोबत काय घडलं जाणून घेऊयात…
तर घडलं असं की, किशोरी शहाणे या कामासाठी ठाणे-मुंबई मार्गावरून प्रवास करत होत्या. यावेळी एका वाहनचालकानं त्यांच्या कारला बाजूने धडक दिली. या धडकेमुळे किशोरींच्या गाडीचा साईड मिरर पूर्णपणे तुटला आणि गाडीच्या दरवाजाचंही बऱ्यापैकी नुकसान झालं. इतकंच नाही तर, अपघातानंतर तो संबंधित वाहनचालक अपघातास्थळी न थांबता निघून गेल्यानं किशोरींचा अधिक संताप झाला.

अपघाताचा व्हिडिओ आणि फोटो किशोरी यांनी शेअर केलं आहे की, खरं तर सगळ्यांनाच पुढं जाण्याची घाई असते, मलाही आहे. पण तुम्ही इतके असंवेदनशील कसं असू शकता? कोणाच्या तरी गाडीला धडक बसतेय, त्यांचं नुकसान होतंय याकडं तुमचं लक्षही नसतं. मला त्या व्यक्तीचा खूप राग येतोय… अशा घटनांमुळं केवळ पैसा आणि वेळच वाया जात नाही, तर मनस्तापही प्रचंड होतो, असं म्हणत किशोरी यांनी संताप व्यक्त केला आहे.
================================
हे देखील वाचा : शाहिद कपूरच्या ‘O’Romeo’ चित्रपटाचा डॅशिंग टीझर रिलीज
================================
दरम्यान, किशोरी यांच्या कामाबद्दल बोलायचं तर, सध्या त्या सध्या हिंदी मालिका विश्वात विशेष सक्रिय आहेत. लवकरच त्या ‘माना की हम यार नहीं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ‘आयत्या घरात घरोबा’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘एक डाव धोबी पछाड’, ‘जीवा सखा’ अशा बऱ्याच चित्रपटांत त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi