Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने गोंडस कन्येला दिला जन्म!
प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्ये काय कथेचा काय ट्रॅक सुरु आहे आणि त्यांच्या आवडत्या कलाकरांच्या वैयक्तिक जीवनात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. अशीच आनंदाची बातमी मालिकाविश्वातून आली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मधील अभिनेत्री मोनिका दबडे (Monika Dabade) हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. आणि आता तिच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे.
‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेत मोनिकाने अर्जुनच्या बहीणचं अस्मिताचं पात्र साकारलं होतं. दरम्यान, मोनिकाला १५ मार्च २०२५ रोजी मुलगी झाली असून सोशल मीडियावरील तिने ही माहिती दिली आहे. मोनिका (Monika Dabade) लिहिते, “दाहीदिशांतून कशी नांदी झाली हो…गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो…आणि नवे पर्व सुरु …15.03.2025”. तिच्या या पोस्टखाली चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत मुलीचं स्वागत केलं आहे. (Marathi daily soaps)

मोनिका (Monika Dabade) सोशल मिडीयावर फार स्क्रीन असते. सेटवरील धमाल रिल्स ती तिच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करत असते. आई होणार असल्याची गुडन्यूज देखील तिने सोशल मीडियावरील हटके अंदाजात दिली होती. इतकंच नाही तर ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर तिचं डोहाळ जेवण देखील साजरं करण्याची आलं होतं. सध्या तिने मालिकेतून ब्रेक घेतला असून लवकरच आईपण ती इन्जॉय करताना दिसतेय. (Marathi serials update)