पूजा बिरारी विचारते आहे “कोणी घर देतं का घर?”
लॉकडाऊनमुळे देशातील सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्याला कलाकार देखील अपवाद नाहीत. झी युवावरील साजणा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली आणि आता एका नव्या भूमिकेत ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मध्ये येणारी गुणी आणि प्रेक्षकांची लाड़की अभिनेत्री पूजा बिरारी देखील एका अडचणीत आहे.
कोरोना काळात तिच्यावर आलेल्या संकटा बद्दल बोलताना पूजा म्हणाली, “नमस्कार मी पूजा बिरारी, मी एक कलाकार आहे. तुम्ही मला झी युवा वाहिनीवर साजणा या मालिकेत पाहीलत आणि रमा या माझ्या व्यक्तिरेखेवर भरपूर प्रेम ही केलं. या लॉकडाऊनमध्ये देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि त्यामुळेच आपल्या सध्याच्या सरकारने सर्व गोष्टींची काळजी घेत न्यू-नॉर्मल लाईफचे आवाहन केले. आपली मनोरंजनसृष्टीसुद्धा हळूहळू का होईना सुरु झाली. पण काही प्रॉब्लेम्स हे मालिकांच्या बिहाइंड सीन सारखे आहेत आणि सध्या कलाकार म्हणून माझ्या बाबतीत ते घडत आहेत आणि म्हणूनच मला ते माझ्या लाडक्या प्रेक्षकांसमोर आणायचे आहेत.
सध्या कोरोनाच्या या संकटात कलाकार म्हणून तुम्हाला मुंबईमध्ये काम मिळेल मात्र राहायला भाड्याचे घर मिळणं दुर्लभ झालंय. झी युवा या वाहिनीने ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत मला पुनः संधी दिली. या लॉकडाऊनमध्ये एक चांगले काम मिळणं हे प्रत्येक कलाकारासाठी खूप महत्वाचे आहे जे मला मिळालं मात्र ते जर तसच ठेवायच असेल तर मला मुंबईमध्ये राहयाला भाड्याने घर हवंय मात्र ते काही सध्या मिळताना दिसत नाही आहे आणि मला आता खरंच घर शोधण्याचा आणि सतत नकार मिळण्याचा त्रास आणि कंटाळा आलाय. झी युवा वाहिनीने सेट वर जागा अरेंज करण्याचा प्रयत्न केला पण ऑलरेडी अप्पा आणि काही इतर लोक शूटिंग सुरु झाल्यापासून राहत असल्यामुळे रूम्स नाही आहेत त्यामुळे ते शक्य झाले नाही. सध्या मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचे माझे सहकलाकार, सोहम निर्मिती संस्था आणि झी युवा वाहिनी सगळेच माझ्यासाठी घर शोधत आहेत. मात्र सध्या कोणत्याच सोसायटीमध्ये नविन व्यक्तीला प्रवेश नाही..” सध्या या घरामुळे एकंदरच पूजाला काम करताना अडचणी येत आहेत
पूजासारखे अनेक कलाकार बाहेरच्या शहरातून मुंबईमध्ये कामा-निमित्त येतात. पण त्यांना निवडक सोसायटी सेक्रेटरी आम्हाला लॉकडाऊनच्या नावावर जागा द्यायला नकार देत आहेत. सध्या सगळं हळूहळू सुरु झालंय पण अजूनही न्यू नॉर्मलचे रूल्स मानले जात नाही आहेत.त्यामुळे कलाकारांना अडचणी येत आहेत. स्वतःची काळजी घेऊन जर काम नाहीं सुरु करू शकलो तर कसं होणार असा प्रश्न त्यामुळे कलाकारांना पडला आहे.