Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Andhera Web Series: हॉरर वेबसीरिज ‘अंधेरा’तून अभिनेत्री प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत !
मराठी चित्रपटसृष्टीपासून ते हिंदी मनोरंजन क्षेत्रापर्यंत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रिया बापट आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि थरारक अविष्कारात दिसणार आहे. अमेझॉन प्राईमवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अंधेरा’ या बहुचर्चित हॉरर वेबसीरिजमध्ये ती एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार असून, नुकताच या सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे. या ट्रेलरनेच प्रेक्षकांमध्ये भीती, कुतूहल आणि उत्सुकता निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, ‘अंधेरा’मधून प्रियाने पहिल्यांदाच हॉरर जॉनरमध्ये पाऊल टाकले असून, यात ती पोलिसाची दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी हा एक नवा आणि रोमांचक अनुभव ठरणार आहे.( Andhera Web Series )

या भूमिकेबद्दल बोलताना प्रिया बापट म्हणते, “हा माझा पहिलाच हॉरर जॉनरमधला अनुभव आहे आणि तो खरोखरच वेगळा ठरला. अनेक नाईट शिफ्ट्समध्ये काम केलं, पण कथा इतकी रोचक होती की थकवा जाणवला नाही. मला जेव्हा हे स्क्रिप्ट मिळालं, तेव्हा वाचून एकच विचार आला, ही माझ्या हातात आलेल्या सर्वोत्कृष्ट कथांपैकी एक आहे. या कथानकाची मांडणी फारच वेगळी आहे आणि त्यामुळे अभिनयाच्या दृष्टीने ती आव्हानात्मक ठरली. यात थरारक हॉरर दृश्यं, दमदार अॅक्शन सिक्वेन्सेस आहेत, जे प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतील.”

प्रियाने आतापर्यंत राजकारणी, वकील अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, मात्र पोलिसाच्या भूमिकेत ती प्रथमच दिसणार आहे. “मराठी प्रोजेक्ट्सना मिळालेल्या प्रेमासोबतच मला हिंदी प्रोजेक्ट्ससाठीही तितकाच प्रतिसाद मिळाल्याचा आनंद आहे. आता हॉरर जॉनरमध्ये प्रेक्षकांची मने जिंकण्याची उत्सुकता आहे,” असे प्रिया सांगते.( Andhera Web Series )
================================
================================
‘अंधेरा’चा ट्रेलर पाहून कथानकाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही कथा नेमकी कोणत्या दिशेने जाणार, यातील रहस्य उलगडणार कसे, आणि या अंधारात दडलेलं सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, सध्या तरी ट्रेलरमधील थरारक झलक, भयानक वातावरण, आणि प्रिया बापटचे हॉरर शैलीतील दमदार पदार्पण यामुळे ‘अंधेरा’ प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.