लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं… गेल्या काही महिन्यांपासून तिची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली… वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी तिने मुंबईत तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला… तिच्या निधनामुळे खरोखरीच मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटविश्वात पोकळी निर्माण झाली आहे… प्रिया मराठे हिने आजवर विविधांगी भूमिका साकारल्या… परंतु, पवित्र रिश्ता या हिंदी आणि चार दिवस सासूचे या मराठी मालिकेतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या…

प्रिया मराठे हिने २००१ मध्ये आलेल्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेत सोना देशमुख ही भूमिका साकारली होती… त्यानंतर अभिनेत्री म्हणून ‘या सुखांनो या’ मालिकेतून तिने खरं पदार्पण केलं होतं… त्यानंतर पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून तिला अधिक लोकप्रियता मिळाली होती… प्रियाने ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘तु तिथे मी’, ‘उतरन’ अशा अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्ये तिने कामं केली होती…प्रियाने मालिका करुनही रंगभूमीकडे दुर्लक्ष केलं नव्हतं… एकीकडे मालिका सुरु असताना प्रिया अनिकेत विश्वासरावसोबत ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ या नाटकात ती काम करत होती…
============================
============================
प्रिया हिने फार कमी वर्षांमध्ये इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली होती… ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनु मोघे याच्या तिने लग्न केलं होतं… दोघांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत एकत्र काम देखील केलं होतं… अतिशय कमी वयात सिनेसृष्टीतून अचानक प्रियाची झालेली एक्झिट प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे…