
Sunny Leone : सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क सनी लिओनीचे नाव; जाणून घ्या काय आहे भानगड
आपल्या बोल्ड भूमिकांमुळे आणि लुक्समुळे अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सतत चर्चेत असते. सध्या चित्रपटांमध्ये जास्त न दिसूनही सनी सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. या ना कारणांमुळे ती मीडियासमोर (Media) येते आणि गाजते देखील. आपल्या मादक व्यक्तिमत्वामुळे सनी लिओनी हे नाव सतत लोकांमध्ये चर्चेत येत असते. आता देखील सनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Sunny Leone News)
मात्र यावेळी सनी लियोनी हे नाव चर्चेत येण्याचे कारण कोणता चित्रपट नाही किंवा तिचे विविध फोटो ही नाही तर वेगळेच आहे. ग्लॅमर (Glamour) विश्वात काम करणाऱ्या सनी लियोनीने एका सरकारी योजनेचा लाभ (Government Scheme) घेतल्याने ती चर्चेत आली आहे. आता हे ऐकून आश्चर्य वाटत असेल ना? मात्र हे खरे आहे. आलिशान आयुष्य जगणाऱ्या आणि कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सनीने चक्क एका सरकारी योजनेचा लाभ घेतला? हे ऐकून चकित झालात? मात्र हे खरे आहे. कसे ते जाणून घेऊया.
छत्तीसगड (Chhattisgarh) राज्याच्या बस्तर (Bastar) जिल्ह्यामध्ये (District) काँग्रेसच्या (Congress) नेत्याच्या कुटुंबातील तीन महिलांसोबतच अभिनेत्री सनी लिओनी ही देखील महतारी वंदन योजनेचा (Mahtari vandan yojana) लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून सनी लिओनी हिला पैसे पाठवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. यानंतर या संपूर्ण प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

छत्तीसगड येथे सनी लिओनीच्या नावाने एक ऑनलाईन खाते उघडण्यात आले होते. या खात्यामध्ये विवाहित महिलांना महतरी वंदन या सरकारच्या योजनेअंतर्गत दर महिन्याला १००० रुपये (Every Month 1000 Rupee) दिले जात होते. या योजनेची घोषणा राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा सरकारने (BJP Government) निवडणूक (Election) प्रचारादरम्यान त्यांच्या जाहीरनाम्यात केली होती. दरम्यान आता बस्तर जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे.
या योजनेच्या अर्जामध्ये सनीचे फक्त नावच नाही तर पत्ताही देण्यात आला आहे. त्यात मात्र बस्तर, तलूर या ठिकाणाचा उल्लेख केल्याचे समजत आहे. सनीच्या नावे बस्तरचा पत्ता नमूद करत हा अर्ज स्वीकारला गेला आहे. त्याचमुळे तिच्या कथित खात्यावर दर महिन्याला योजनेतील रक्कमही जमा होत असल्याचे लक्षात आले.
इतकेच नाही तर या नोंदणीच्या अर्जामध्ये सनीच्या नवऱ्याच्या नावाचा देखील उल्लेख असून, हॉलिवूड (Hollywood) अभिनेता जॉनी सिंसला (Johnny Sins) तिचा नवरा म्हणून यात दाखवण्यात आले आहे. तलूरच्या अंगणवाडीतून हा अर्ज करण्यात आला असून, अधिकाऱ्यांनी या अर्जाला मान्यता दिल्याचे देखील समजत आहे.
दरम्यान ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी हरिस एस (Collector Haris S.) यांनी महिला व बालविकास विभागाच्या (Women and Child Development Department) जिल्हा अधिकाऱ्यांना ‘महतरी वंदन योजने’च्या तलूर गावातील गैरप्रकारांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणाची चौकशी चालू असताना लक्षात आले की, वीरेंद्र जोशी (Virendra Joshi) नावाच्या व्यक्तीने फसवणूक करून या खात्यातून बेकायदेशीरपणे रक्कम काढल्याचे दिसले.
त्यानंतर सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी आता वीरेंद्र जोशी याच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. शिवाय त्याचे बँक अकाऊंटही होल्ड केले गेले आहे. त्याच्यावर आता वसूलीची कारवाई करण्यात येत असल्याचे समजते. तसेच संबंधित कामगार आणि तत्कालीन पर्यवेक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.