दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
बॉलिवूडमध्ये अपयशी झालेल्या ‘या’ अभिनेत्री सध्या काय करतात?
हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं. मात्र त्यानंतर आलेले त्याचे काही चित्रपट ओळीने फ्लॉप गेले. त्यानंतर त्याची तुलना कुमार गौरवशी व्हायला लागली. कारण ‘लव्ह स्टोरी’ या सुपरहिट चित्रपटाच्या यशानंतर कुमार गौरवचा एकही चित्रपट सुपरहिट झाला नव्हता. परंतु, नंतर मात्र हृतिकने आपलं करिअर सावरलं आणि त्याच्यावरचा ‘वन मुव्ही वंडर’ हा शिक्का पुसला गेला.
बॉलिवूडमध्ये काही कलाकार जसे अचानक येतात तसेच अचानक कुठे गायब होतात कळतही नाही. नंतर कधीतरी त्यांच्याबद्दल माहिती मिळते आणि कळतं बॉलिवूडमध्ये जरी ते यशस्वी झाले नसले, तरीही त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवली आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्रींनबद्दल आणि “त्या सध्या काय करतात” याबद्दल जाणून घेऊया. (Actresses failed in Bollywood)
१. मयुरी कांगो
तुम्हाला जुगल हंसराज आठवतोय? “घर से निकलते हि कुछ दूर चलते हि…. ” या गाण्यामधला निळ्या डोळ्यांचा जुगल हंसराज तेव्हा कित्येक तरुणींच्या ‘दिल कि धडकन’ वाढवत होता. आणि चित्रपटात जुगल जिच्यासाठी हे गाणं म्हणतो, ती गोड नायिका मयुरी कांगो कदाचित विशेष कोणाला आठवत नसेल. थोडा डोक्याला ताण दिलात तर सहज आठवेल. तर हे गाणं हीच मयुरीची ओळख होती कारण बॉलिवूडमध्ये यश काही तिच्या आसपास फिरकायला तयार नव्हतं. चित्रपटसृष्टीमध्ये तब्बल आठ वर्ष नशीब आजमावायचा प्रयत्न करून मयुरीने बॉलीवूडला रामराम ठोकला. (Actresses failed in Bollywood)
सामन्यात बॉलीवूडमध्ये अपयशी झाल्यावर बॉलिवूडमधल्या नायिका एखाद्या उद्योगपतींशी किंवा एनआरआय शी लग्न करून आयुष्यात सेटल होतात. तसंच काहीसं मयुरीनेही केलं. २००५ मध्ये एनआरआय आदित्य धिल्लोन याच्याशी लग्न करून ती न्यूयॉर्कला निघून गेली.
परंतु, मयुरी मुळातच हुशार होती. लग्न करून गृहिणी म्हणून राहणं तिला शक्यच नव्हतं. त्यामुळे तिने न्यूयॉर्कला गेल्यावर सिटी युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये आपले एमबीए पूर्ण केले. एमबीएची डिग्री मिळाल्यावर ती ‘परफॉर्मिक्स’ या कंपनीमध्ये ‘व्यवस्थापकीय संचालक’ या पदावर रुजू झाली.
यानंतर मात्र मयुरीला आपल्या यशाचा मार्ग गवसला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण मयुरी कांगो सध्या गुगल इंडियामध्ये “इंडस्ट्री हेड” या पदावर काम करत आहे.
२. किम शर्मा –
पुन्हा एकदा जुगल हंसराज! ‘मोहब्बते’ चित्रपटामधली जुगल हंसराजची नायिका किम शर्मा बहुतेकांना माहिती असेल. ‘मोहब्बते’ या तिच्या पहिल्या चित्रपटामध्ये तिला फारसा वाव मिळाला नव्हता. त्यानंतरही तिच्या वाट्याला चांगले चित्रपट आले नाहीत. चित्रपटांपेक्षा ती क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतच्या अफेअर्समुळे जास्त चर्चेत आली होती. (Actresses failed in Bollywood)
‘ताजमहल: द इटरनल लव्ह स्टोरी’ या चित्रपटानंतर ती फारशी कुठे दिसली नाही. बॉलिवूडइतकंच तिचं वैयक्तिक आयुष्यही दुःखद होतं. युवराज सिंगशी ब्रेकअप झाल्यांनतर अनेक अभिनेत्यांशी तिचं नाव जोडण्यात आलं. अखेर २०१० साली अली पंजाबीशी विवाह करून तिने आपलं वैवाहिक आयुष्य सुरु केलं.पण इथेही तिला अपयश आलं आणि २०१६ साली तिचा आणि अलीचा घटस्फोट झाला.
=====
हे देखील वाचा: विद्या बालन सगळ्यांपेक्षा वेगळी, म्हणूनच यशस्वी.
=====
बॉलिवूडमधलं अपयश आणि वैयक्तिक आयुष्यातलं दुःख या दोन्ही गोष्टी तिने पचवल्या आणि ती व्यवसायात उतरली. तिने सुरु केलेला ‘संपर्क’ ब्रायडल ग्रूमिंग स्टुडिओ’ सध्याच्या टॉपच्या ब्रायडल ग्रूमिंग स्टुडिओ’ मध्ये गणला जातो.
३. ट्विंकल खन्ना –
तळपत्या सूर्यापुढे चंद्र झाकोळला जातो. ट्विंकलच्या घरात तर दोन तेजस्वी सूर्य होते. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्नासारख्या इंडस्ट्रीमधल्या दोन वलयांकित व्यक्ती तिचे पालक होते. स्टारकिड असूनही ट्विंकलला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. (Actresses failed in Bollywood)
====
हे देखील वाचा: चक्क मोबाईलवर चित्रित झाला ‘पाँडीचेरी’ हा मराठी चित्रपट .. ‘हे’ होतं त्यामागचं कारण
====
२००१ मध्ये आलेल्या ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटामध्ये ती शेवटची दिसली होती. त्यांनतर तिने आपला मोर्चा लेखन आणि फॅशन डिझाईनिंगकडे वळवला. ट्विंकलने लिहिलेली’ मिसेस फनीबॉन्स’ ही कादंबरी बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीमध्ये गणली जाते. सध्या ती ‘द व्हाईट विंडो’ नावाने एक डिझाईन स्टुडिओ चालवते. शिवाय बॉलिवूडमध्ये निर्माता म्हणूनही ती यशस्वी आहे.